मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने बुधवारी 29 फेब्रुवारी 2024 पासून पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड (PPBL) वर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. याचा अर्थ असा की 29 फेब्रुवारी 2024 पासून Paytm Payments Bank Limited ला नवीन ग्राहकांना ऑनबोर्डिंग करण्यापासून, कोणत्याही ग्राहकांच्या खात्यांवर, वॉलेट्स आणि FASTags वर ठेवी टॉप-अप स्वीकारण्यापासून  प्रतिबंधित केले जाणार नाही. 


यासंदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेने आपल्या अधिकृत वेबसाईटवर एक अधिसूचना जारी केली. यामध्ये पेटीएमच्या काही सेवांना परवानगी दिली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे युजर्स त्यांच्या पेटीएम वॉलेटमधील शिल्लक पैसे त्यांच्या सेविंग अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करु शकतील. तसेच आता तुम्ही सेच पेमेंट करण्यासाठी पेटीएमऐवजी तुम्ही कोणते प्लॅटफॉर्म वापरू शकता याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. 


आरबीआयद्वारे सूचना जारी


आरबीआयने त्यांच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, ग्राहक पेटीएम ग्राहक  बचत बँक खाते, चालू खाते, प्रीपेड इन्स्ट्रुमेंट्स, फास्टॅग आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डमधील शिल्लक रक्कम कोणत्याही निर्बंधाशिवाय काढू किंवा वापरू शकतील. तसेच आरबीआय द्वारे एक नोटीफिकेशन देखील काढण्यात आले आहे. यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की, पाइपलाइन ट्रानजॅक्शन आणि नोडल अकाऊंट्स (29 फेब्रुवारी किंवा त्यापूर्वी सुरू केलेल्या सर्व व्यवहारांच्या संदर्भात) व्यवहार पूर्ण करण्याची वेळ 15 मार्चपर्यंत वाढवली जाईल आणि त्यानंतर कोणत्याही व्यवहारांना परवानगी दिली जाणार नाही.


पेटीएमसाठी 'या' अॅप्सचा करता येणार वापर


भारतामध्ये ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी पेटीएम हा सर्वात मोठा पर्याय होता. पेटीएमच्या माध्यमातून दररोज लाखो रुपयांचे व्यवहार केले जात होते. पण आता पेटीएम बँकेच्या अनेक सेवांवर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून बंदी घालण्यात आल्यानंतर ग्राहकांना आता इतर पेमेंट ऑप्शनचा वापर करावा लागणार आहे. पेटीएम ऐवजी तुम्ही कोणत्या इतर अॅप्सचा वापर करु शकता याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. 



  • PhonePe

  • Google Pay

  • AmazonPay

  • WhatsApp Pay

  • Mobikwik

  • Freecharge

  • Airtel Money

  • Jio Money


पेटीएम बँकेवर आरबीआयने निर्बंध घातल्यानंतर ग्राहकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. दरम्यान आता आरबीआयकडूनच यासंदर्भात अधिकचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांचा संभ्रम देखील दूर होण्यास मदत होऊ शकते. तसेच यामुळे पेटीएम बँकेच्या माध्यमातून जे आर्थिक व्यवहार करण्यात येत होते, त्याशिवाय आता कोणत्या अॅप्सच्या माध्यमातून हे आर्थिक व्यवहार होऊ शकतात याविषयी देखील जाणून घेता येईल.  


ही बातमी वाचा : 


iPhone Upcoming Feature : Apple ची मोठी तयारी! लवकरच आयफोनवर मिळणार AI फिचर