Samsung Galaxy Unpacked Event 2023 : सॅमसंगच्या (Samsung) स्मार्टफोनचं वैशिष्ट्य हे आपल्या सगळ्यांनाचा माहित आहे. कमी किमतीत जास्तीत जास्त फिचर्स उपलब्ध करून देणारा हा स्मार्टफोन तरूणाईत विशेष लोकप्रिय आहे. Samsung ने Galaxy Unpacked इव्हेंट 2023 मध्ये नवीन फ्लिप फोन, फोल्डेबल स्मार्टफोन, नवीन Galaxy टॅबलेट आणि नवीन स्मार्टवॉच लॉन्च केले आहेत. येथे आम्ही तुम्हाला Samsung Galaxy Watch 6 आणि Samsung Galaxy Tab S9 च्या किंमती आणि फीचर्सबद्दल सविस्तर जाणून घ्या.
सॅमसंगच्या नवीनतम उपकरणाची प्री-बुकिंग आजपासून सुरू झाली आहे. तुम्ही आता हे डिव्हाइस बुक केल्यास तुम्हाला 5,000 रुपयांपर्यंतचे फायदे मिळतील. सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवरून 1999 रुपये देऊन नवीन टॅबलेट बुक करता येईल . तर Galaxy Watch 6 हे11 ऑगस्टपासून उपलब्ध करून दिला जाणार आहे.
सॅमसंग गॅलेक्सी वॉच 6
गॅलेक्सी वॉच 6 सीरीज स्टँडर्ड आणि क्लासिक व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. दोन्ही मॉडेल्स राउंड डायल्ससह येतात. नवीन स्मार्टवॉचमध्ये WearOS 4 देण्यात आला आहे. या स्मार्टवॉचमध्ये हृदयावर लक्ष ठेवण्यासाठी पीपीजी सेन्सर देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त, हे घड्याळ तुम्हाला दिवसभरात किती कॅफिनचे सेवन करत आहे याबद्दल अलर्ट करेल. त्याच्या मदतीने तुम्ही ध्यान देखील करू शकाल. हे घड्याळ तुम्हाला निरोगी राखण्यात मदत करेल.
सॅमसंग गॅलेक्सी वॉच 6 किंमत
हे दोन आकारात (40 मिमी आणि 44 मिमी) आणि एकाधिक रंग पर्यायांमध्ये खरेदी केले जाऊ शकते. Samsung Galaxy Watch 6 ची किंमत अंदाजे रु. 24,525 पासून सुरू होते, जी त्याच्या स्टँडर्ड मॉडेलची किंमत आहे. Galaxy Watch 6 Classic ची किंमत सुमारे 32,727 रुपये आहे.
Samsung Galaxy Tab S9
या नवीन सॅमसंग टॅबलेटमध्ये डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले देण्यात आला असून तो 120 Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या डिवाइस मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन Gen 2 प्रोसेसर देण्यात आला आहे. हाच चिपसेट फ्लिप आणि फोल्ड उपकरणांमध्ये देखील उपलब्ध आहे
यासोबतच या प्रीमियम टॅबलेट सीरिजमध्ये एस-पेनही उपलब्ध असेल. याशिवाय, S9 हा पहिला गॅलेक्सी टॅब आहे ज्यामध्ये व्हेपर चेंबर कूलिंग उपलब्ध आहे. हे डिव्हाइस IP68 रेटिंग, ड्युअल बॅक कॅमेरा सेटअप आणि ड्युअल सेल्फी कॅमेरासह येते.
Samsung Galaxy Tab S9 किंमत
Galaxy Tab S9 S9, S9 Plus आणि S9 Ultra या तीन प्रकारांमध्ये खरेदी करता येईल. Samsung Galaxy Tab S9 ची किंमत सुमारे 65,537 रुपये आहे. Galaxy Tab S9 Plus ची किंमत सुमारे 81,942 रुपये आहे तर Galaxy Tab S9 Ultra ची किंमत सुमारे 98,347 रुपये आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Netflix New Feature : आता नेटफ्लिक्सवर चित्रपट शोधण्याची कटकट संपली, जाणून घ्या 'या' नविन फिचरविषयी