How to download ChatGPT app for Android : सध्या सगळीकडेच चॅट जीपीटीची (ChatGPT) चर्चा होतेय. ओपन एआयने हेच अॅप आता भारत, ब्राझील, अमेरिका आणि बांगलादेशमध्ये लॉन्च केलं आहे. येत्या काळात कंपनी इतर देशांमध्येही ते लॉन्च करणार आहे. सध्या या देशांतील यूजर्स प्लेस्टोअरवर जाऊन अॅप डाऊनलोड करू शकतात.


खरंतर, प्ले स्टोअरवर याच नावाचे अनेक अॅप्लिकेशन्स आहेत जे हॅकर्सनी यासाठी तयार केले आहेत. जेणेकरून ते लोकांचा डेटा चोरू शकतील. त्यामुळे तुम्हाला जर हे अॅप डाऊनलोड करायचं असेल, तर प्ले स्टोअरवर Open AI ने पब्लिश केलेलेच अॅप डाऊनलोड करा. तुम्ही इतर कोणतेही अॅप डाउनलोड केल्यास तुमचा डेटा लीक किंवा हॅक होऊ शकतो.


चॅट जीपीटी (ChatGPT) हे ओपन एआयने (AI) गेल्या वर्षी लॉन्च केले होते. या चॅटबॉटने अल्पावधीत काळातच इतकी लोकप्रियता मिळवली की आज हा जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. अँड्रॉइड फोनसाठी चॅट जीपीटी अॅपचा इंटरफेस थोडासा बदलला आहे. परंतु त्याची कार्य करण्याची पद्धत तशीच आहे. चॅटबॉट्ससह तुम्ही वेबवर जसे प्रश्नांची उत्तरे देऊ शकता. अॅप वापरताना, एखाद्या मित्राशी बोलत असल्याचा तुम्हाला भास होईल.


डाऊनलोड करण्यासाठी 'या' स्टेप्स फॉलो करा 



  • सर्वात आधी प्लेस्टोअरवर जा आणि ChatGPT अॅप टाईप करा 

  • आता तुम्हाला Open AI च्या लोगोसह एक अॅप दिसेल.

  • अॅप इन्स्टॉल केल्यानंतर आयडी पासवर्डच्या मदतीने लॉगिन करा. जर तुम्ही पहिल्यांदा अॅप वापरत असाल तर गुगलच्या मदतीने नोंदणी करा.


असे लोक जे जुन्या खात्याने लॉग इन करतात त्यांना त्यांचे जुने चॅट देखील पाहता येईल. म्हणजेच तुम्ही वेबवर केलेले प्रश्न आणि उत्तरे तुम्हाला अॅपमध्येही दिसतील. सध्या चॅट जीपीटीचे 2 व्हर्जन आहेत. पहिली मोफत चॅट GPT-3 आणि दुसरी अॅडव्हान्स GPT-4 वर आधारित आहे. GPT-4 मध्ये तुम्हाला इंटरनेटवरूनही उत्तरे मिळतील. म्हणजेच हा चॅटबॉट इंटरनेटवरूनही गोष्टी शोधू शकतो, तर फ्री व्हर्जनमध्ये तसे नाही. 


OpenAI द्वारे विकसित केलेले ChatGPT हे एक ॲप्लिकेशन आहे जे मानवासारखे संभाषण करण्याच्या उद्देशाने डिझाईन करण्यात आले आहे. तुम्ही या अॅपच्या माध्यमातून कोणत्याही समस्येचे उत्तर देण्यासाठी तुम्ही ChatGPT ची मदत घेऊ शकता.


महत्त्वाच्या बातम्या : 


Cyber Alert: तुमच्या कॉम्प्युटर, लॅपटॉपमध्ये शिरू शकतो 'अकिरा' व्हायरस; सरकारने दिला धोक्याचा इशारा