खुशखबर ! सॅमसंग गॅलेक्सी J3 (2016) च्या किमतीत कपात
या स्मार्टफोनला स्नॅपडील ऑनलाइन शॉपिंगच्या वेबसाइटवरूनही खरेदी करता येते.
फोनमध्ये १.५ जीबी रॅम आणि १६ जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे.
या स्मार्टफोनमध्ये ड्यूअल सीम कार्ड स्लॉट, 4G LTE, ब्लूटूथ आणि वायफाय देण्यात आले आहे. तसेच या स्मार्टफोनच्या खरेदीवेळी ग्राहकांना १५०० रुपयांची फ्रिचार्ज क्रेडीट ऑफरही मिळणार आहे.
यामधील स्पेसिफिकेशन बद्दल सांगायचे तर, या स्मार्टफोनमध्ये ५ इंचाचा HD सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच स्क्रिन रिझॉलेशन 1280 x 720 पिक्सल आहे. या फोनमध्ये 1.5GHz क्वाडकोर प्रोसेसर देण्यात आला आहे.
पण आता कंपनीने या स्मार्टफोनच्या किमतीत पाचशे रुपयांची कपात केली आहे. आता या स्मार्टफोनची किंमत ८,४९० इतकी झाली आहे.
साउथ कोरियाची मोबाईल कंपनी सॅमसंगने आपल्या गॅलेक्सी J3 (2016) या स्मार्टफोनच्या किमतीत कपात केली आहे. या स्मार्टफोनची लाँचिंगवेळी किंमत 8990 रुपये होती.
या फोनला S बाइक मोड या नव्या फिचरने लाँच करण्यात आले आहे. या मोडने तुम्ही बाइक चालवत असाल, त्यावेळी वारंवार येणाऱ्या नोटिफिकेशनच्या त्रासातून तुमची सुटका होईल. तुमची बाइकस्वारी संपल्यानंतर तुम्हाला कॉल करणाऱ्या व्यक्तींना कॉल करण्यासंदर्भातील मॅसेज अॅटोमेटीक जाईल.