कायली जेनर करणार 'खास' लिप्स्टिक्स लाँच
एबीपी माझा वेब टीम | 21 Jun 2016 09:14 PM (IST)
1
रिअॅलिटी टिव्ही शोवरचा प्रसिद्ध चेहरा कायली जेनर आपल्या कायली कॉस्मेटिक्स मेकअप रेंजमध्ये एक नवीन 'खास' लिप्स्टिक्स लाँच करणार आहे.
2
आज तिच्या लिप्स्टिक्सची महिला जगतात प्रचंड क्रेज आहे.
3
'फिमेल फर्स्ट डॉट यूके' या संकेतस्थळाच्या रिपोर्टनुसार, रिअॅलिटी टिव्ही शोवरचा प्रसिद्ध चेहऱ्याने स्नॅपचॅटवरील व्हिडिओमधून याची माहिती दिली आहे.
4
कायली जेनर ही अमेरिकेची प्रसिद्ध टिव्ही शो अॅक्टर असून तिने तिच्या बहिणीसोबत कायली कॉस्मेटिक्स नावाने कंपनी सुरु केली.
5
कायलीने एका क्लिपसाठी पोज दिला. ही क्लिप रिलिज करताना तिने क्लिपच्या कॅप्शनमध्ये येत्या शुक्रवारी दोन 'खास' शेडस् पाहायला मिळतील असे कॅप्शनमध्य़े लिहले होते. कायलीच्या क्लिपमध्ये तिने दोन लिप किटस दिले होते.