तुमच्या बजेटमधील सॅमसंगचा J2 प्रो स्मार्टफोन लाँच
यामध्ये 8 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा, तर 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आलेला आहे. हे डिव्हाईस 6.0मार्शमॅलो ओएसवर कार्यरत आहे. कनेक्टिव्हीटीसाठी यामध्ये 4G LTE, ड्यूअल सिम, यूएसबी, जीपीएस, वायफायसारखे ऑप्शन देण्यात आले आहेत. या फोनला पॉवरसाठी 2600mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
या स्मार्टफोनला 5 इंचाचा एचडी एमोलेड स्क्रिन आहे. J2 प्रो 1.5GHz क्वार्ट कोर प्रोसेसर आणि 2 GBची रॅम देण्यात आली आहे. इंटरनल स्टोअरेजसाठी याफोनमध्ये 16GB च्या मेमरीला 128 GB पर्यंत वाढवता येऊ शकते.
यामुळे तुम्हाला प्रत्येकवेळी नव्या नोटिफिकेशनची सूचना मिळेल. विशेष म्हणजे या एलईडीचा वापर कोणत्याही एका अॅपसाठी वेगळ्या रंगाच्या लाईटमध्ये सेट करता येईल.
या स्मार्टफोनला टर्बो स्पिड टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. यामुळे तुमची रॅम वेळोवेळी क्लिन राहिल. तसेच अॅपचा स्पिड 40%नी वाढेल.
गॅलेक्सी J2 प्रोच्या बॅक पॅनेलवर स्मार्ट ग्लो रिंग देण्यात आली आहे. ही रिंग रियर एलईडीची बनलेली असून ती कॅमेऱ्याच्या चारी बाजूंनी बसवण्यात आली आहे. त्यामुळे तुमच्या मोबाईलवर कधीही एखादे नोटिफिकेशन येईल, तेव्हा या एलईडी लाईट ब्लिंक होईल.
नुकतेच कंपनीने J2(2016)चे वॅरिएंट लाँच केले होते.
सॅमसंगने आपला नवा स्मार्टफोन J2 प्रो स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत फक्त 9980 रुपये आहे. 26 जुलैपासून हा स्मार्टफोन स्नॅपडीलवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.