Google Pay : गुगल पे (Google Pay) देशातील सर्वात लोकप्रिय पेमेंट ॲप्सपैकी (Payment Apps) एक आहे. अलिकडच्या काळात डिजिटल पेमेंटचा (Digital Payment) वापर वाढला असून बहुसंख्य लोक जीपे (GPay) म्हणजेच गुगल पे (Google Pay) वापरताना दिसतात. गुगल पे (Google Pay) ॲपद्वारे तुम्ही कुठेही आणि कधीही पेमेंट करू शकता. गुगल पे (Google Pay) पेमेंट ॲप (Payment App) गुगल (Google) ची सर्वोत्तम कृत्रिम बुद्धिमत्ता आणि फसवणूक प्रतिबंध तंत्रज्ञान वापरते. गुगल कंपनी (Google Company) आपल्या ग्राहकांसाठी अनेक नवीन फिचर आणत आहे, ज्यामुळे ग्राहकांचा अधिक चांगली सुविधा आणि अधिक चांगला अनुभव मिळू शकेल.
गुगल पे (Google Pay) ॲपद्वारे तुम्हाला कुठेही आणि कधीही सहज पेमेंट करण्यात मदत होते. भारतात ऑनलाईन पेमेंट वाढल्याने गुगल कंपनी गुगल पे (Google Pay) ॲपमध्ये सुरक्षिततेची खास काळजी घेते. यासाठी कंपनी सर्वोत्तम कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान (Artificial intelligence) म्हणजे एआय टेक्नॉलॉजी (AI Technology) याचा वापर करते.
गुगल कंपनीने म्हटलं आहे की, आम्ही तुमच्या सुरक्षेसाठी सतत आणि सक्रियपणे काम करत आहोत, पण गुगल पेवर ऑनलाईन पेमेंट करताना तुम्ही देखील काळजी घेणं आवश्यक आहे. त्यामुळे Google Pay वापरताना कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात, याबाबत कंपनीने आपल्या वेबसाइटवर सांगितलं आहे.
'हे' ॲप्स उघडू नका
गुगल पे (Google Pay) द्वारे डिजिटल पेमेंट करताना काही इतर ॲप्स बंद ठेवणे आवश्यक आहे. यामधील एक म्हणजे स्क्रीन शेअरिंग ॲप. गुगल पे (Google Pay) वापरताना स्क्रीन शेअरिंग ॲप्स बंद ठेवणं आवश्यक आहे.
स्क्रीन शेअरिंग ॲप्स का उघडू नयेत, कारण जाणून घ्या.
- गुगल पे (Google Pay) ने हे ॲप न उघडण्यामागे ग्राहकांना काही महत्त्वाची कारणंही दिली आहेत. कंपनीने म्हटलं आहे की, यामुळे स्कॅमरना तुमचे डिव्हाइस नियंत्रित करण्याचा पर्याय मिळतो, जो तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतो.
- स्कॅमर तुमच्या फोनवर नियंत्रण ठेवू शकतात आणि व्यवहार करू शकतात.
- सायबर गुन्हेगार तुमच्या एटीएम किंवा डेबिट कार्डचे तपशील जाणून घेऊन त्याचा गैरवापर करू शकता.
- सायबर गुन्हेगारांना तुमच्या फोनचं नियंत्रण मिळवल्यास स्कॅमरना सर्व OTP आणि SMS वर नियंत्रण मिळेल. याचा स्कॅमर गैरवापर करू शकतात.
'ही' चूक टाळा
याशिवाय, जर तुम्ही कोणताही थर्ड पार्टी ॲप वापरत असाल तर, पेमेंट ॲप वापरण्यापूर्वी ते ॲप बंद करा. कारण हे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते, असा इशारा कंपनीने दिला आहे.