Republic Day parade : प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील परेड पाहणं (Delhi Republic Day parade) हे प्रत्येक भारतीयांचे स्वप्न असतं. मात्र सरकारकडून या दिवशी परेड पाहण्यासाठी काही लिमिटेड संख्येसाठी ऑनलाईन तिकीटची सेवा उपलब्ध करून दिली जाते. अशातच तुम्ही देखील या प्रजासत्ताक दिनाची परेड पाहण्यासाठी इच्छुक असाल तर ऑनलाईन तिकीट बुक करणे हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. 


1950 पासून प्रजासत्ताक दिनाला परेड केली जाते. ही परेड हे या दिवसाचे मुख्य आकर्षण असते. 26 जानेवारी रोजी सकाळी प्रजासत्ताक दिनाची परेड सुरू होते. तुम्ही ही परेड दरवर्षी तुमच्या फोन किंवा लॅपटॉपवर, दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओच्या अधिकृत YouTube चॅनेलवर देखील थेट पाहता .मात्र प्रत्यक्षपणे तिथे जाऊन  परेड पाहणे हा अनुभव वेगळा असतो आणि तो अनुभवण्याकरीता भरपूर लोक उत्सुक असतात. तुम्हाला देखील परेड प्रत्यक्ष बघायची असेल तर आता ऑनलाईन तिकिट बुकिंग सुरू झाली आहे.



यावेळी प्रजासत्ताक दिनाची परेड विजय चौकमध्ये सकाळी 10:00 वाजता सुरू होईल. त्यामुळे ही परेड बघण्यासाठी तुम्हाला सकाळी साडेनऊ वाजता तुमच्या जागेवर हजर राहावे लागेल. या दिवशी दिल्लीच्या नॅशनल स्टेडियमला शेवटचा स्टॉप म्हणून ठेवण्यात आला आहे .जो परेड होणाऱ्या जागेपासून साधारणतः पाच किलोमीटर लांब आहे. 


तिकिटाची किती असेल किंमत? 



प्रजासत्ताक दिना दिवशी परेड बघण्यासाठीचे तिकीट हे 20 रुपयांपासून सुरू होऊन ते 500 रुपयांच्या दरम्यान असणार आहे. ही तिकीट बुकिंग प्रक्रिया 10 जानेवारीपासून सुरू झाली आहे. ही तिकीट 25 जानेवारीपर्यंत तुम्ही बुक करू शकता. प्रत्येक दिवशी लिमिटेड संख्येमध्ये तिकीट विकली जाणार आहे.


तिकीट बुक कशी कराल? 


-‌सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला डिफेन्स मिनिस्ट्री वेबसाईट www.aamntran.mod.gov.in. यावर जावे लागेल. 
‌-यानंतर एक नवीन अकाउंट बनवावे लागेल. ‌
-यानंतर तुमची पर्सनल डिटेल ज्याच्यामध्ये तुमचे नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर या गोष्टी दाखवाव्या लागतील. 
-‌यानंतर मोबाईलवर येणाऱ्या ओटीपी व्हेरिफाय करावे लागेल. 
-‌आता इवेंट ऑप्शन सिलेक्ट करा
- यामध्ये रिपब्लिक डे परेड, बीटिंग द रिट्रीट या गोष्टींचा समावेश असेल. 
‌-ऑनलाइन बुकिंगसाठी तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करावा लागेल. सोबतच ओरिजनल फोटो आयडीसुद्धा दाखवावी लागेल. 
-‌यानंतर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करावे लागेल. 
-अशाप्रकारे तुम्ही प्रजासत्ताक दिना दिवशी तिकिटे ऑनलाईन बुक करू शकतात.


इतर महत्वाची बातमी-


Instagram Scam : Instagram वरील 'या' लिंकवर क्लिक केलं तर खिसा होईल रिकामा; फसवणुकीसाठी सायबर भामट्यांचा नवा फंडा!