Redmi Note 13 Series : स्मार्टफोन ब्रँड Xiaomi लवकरच ग्राहकांसाठी मोठा धमाका करणार आहे. Xiaomi ने Redmi Note 12 Pro 5G आणि Redmi Note 12 Pro+ 5G वर्षाच्या सुरुवातीला लाँच केले होते. आता कंपनी या दोन्ही स्मार्टफोन्सची पुढची सीरिज Redmi Note 13 Pro आणि Redmi Note 13 Pro+ लवकरच लाँच करणार आहेत. या स्मार्टफोनमध्ये 5,020mAh बॅटरी आणि 6.67-इंचाचा OLED डिस्प्ले असू शकतो. सोबतच याचे स्पेसिफिकेशन देखील लीक झाले आहेत. जाणून घेऊयात काय असतील स्पेसिफिकेशन.


दोन्ही स्मार्टफोन 5G असणार आहेत. त्यात 6.67-इंचाचा OLED डिस्प्ले असेल. Redmi Note 13 Pro+ 1TB स्टोरेज आणि 18GB रॅमसह लॉन्च केला जाऊ शकतो. तर Redmi Note 13 Pro 16GB रॅम सह बाजारात लॉन्च केला जाऊ शकतो. आगामी दोन्ही स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असू शकतो, ज्यामध्ये 200-मेगापिक्सेल सेन्सर, 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड सेन्सर आणि 2-मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा असू शकतो. तर, सेल्फी प्रेमींसाठी 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. Redmi Note 13 Pro आणि Note 13 Pro+ मध्ये 5,020mAh बॅटरी आणि 4,880mAh बॅटरी दिली जाऊ शकते. Redmi Note 12 Pro+ 5G आणि Redmi Note 12 Pro 5G या वर्षाच्या सुरुवातीला भारतात लॉन्च करण्यात आले होते. फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह AMOLED डिस्प्ले आहे. स्मार्टफोनमध्ये प्रोसेसर म्हणून MediaTek Dimensity 1080 SoCs चिप वापरण्यात आली आहे. 


Redmi Note 12 Pro, Redmi Note 12 Pro+ स्पेसिफिकेशन आणि फीचर्स


Redmi Note 12 Pro+ ची सुरुवातीची किंमत 29,999 आणि Redmi Note 12 pro ची सुरुवातीची किंमत 26,999 रुपये आहे. हे तिन्ही फोन 5G सपोर्ट देण्यात आला आहे. Redmi Note 12 Pro मालिकेत 6.6-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे, जो फुलएचडी प्लस पॅनेलला सपोर्ट करतो. दोन्ही मॉडेल्स Android 12 OS सह आहेत. ज्यावर MIUI 13 स्क्रिन आहे. डायमेंशन 163.64 x 74.29 x 8.8 मिमी आहे. Redmi Note 12 Pro मध्ये 4,980mAh बॅटरी आहे जी फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. हा फोन 6GB RAM + 128GB व्हेरिएंट आणि 8GB RAM + 256GB स्टोरेज आहे. पण यात 4,300mAh ची बॅटरी आहे. कंपनीने मीडियाटेक चिप या फोनमध्ये वापरली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


WhatsApp New Features : आता इमोजी, मेसेजऐवजी 'या' हटके फीचरद्वारे व्हॉट्सअॅप स्टेटसला रिप्लाय करा, काय आहे नवीन फीचर?