Raksha Bandhan Gift Electric Scooters : बहिण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन (Raksha Bandhan 2023). रक्षाबंधन सणातून बहिण भावामधील प्रेमाचे, आपुलकीचे दृढ नातं दिसून येतं. या सणाला बहिण भावाच्या हातावर राखी बांधून हक्काने भेटवस्तूही मागते. जर तुम्ही पण आपल्या भावंडांसाठी खास गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. गिफ्टचं बजेट थोडं जास्त असेल, काहीतरी छान हटके आणि लॉन्ग लास्टिंग गिफ्ट देणार असाल इलेक्ट्रिक स्कूटर्सचा (Electric Scooters) विचार नक्की करु शकता. या लेखाच्या माध्यमातून पाच सर्वोत्तम इलेक्ट्रिक स्कूटर्सची माहिती देत आहोत, जाणून घ्या तुमच्या बजेटमध्ये कोणता पर्याय योग्य ठरेल.


हिरो इलेक्ट्रिक फोटॉन एलपी 
किंमत - 72,240 रुपये 






हिरो इलेक्ट्रिक फोटॉन भारतात उपलब्‍ध असलेली इलेक्ट्रिक स्‍कूटर आहे. ही स्‍कूटर एका व्‍हेरिएंटमध्‍ये आणि तीन रंगांसह येते. या स्‍कूटरमध्‍ये शक्तिशाली 1200 वॅट मोटर आणि संयोजित ब्रेकिंग सि‍स्‍टमसह फ्रण्ट व रिअर ड्रम ब्रेक्‍स आहेत. फोटॉन दोन ड्राईव्‍ह मोड्स पॉवर व इकॉनॉमी असलेली हाय-स्‍पीड स्‍कूटर आहे. ही स्‍कूटर प्रतितास 45 किमीची अव्‍वल गती देते. ही स्‍कूटर पूर्ण चार्ज असल्‍यास पॉवर मोडमध्‍ये जवळपास 50 किमीची आणि इकॉनॉमी मोडमध्‍ये प्रभावी 80 किमीची रेंज देते. स्‍कूटरमध्‍ये पॉलिकार्बोनेट हेडलॅम्‍प, फ्रण्ट टेलिस्‍कोपिक सस्‍पेंशन, फ्रण्‍ट डिस्‍क ब्रेक आणि अॅण्‍टी-थेफ्ट अलार्म आहे. या स्‍कूटरसाठी राइडर्सकडे वाहन परवाना आणि नोंदणी असणे आवश्‍यक आहे. फोटॉन ब्‍लॅक, बरगंडी आणि व्‍हाईट या तीन रंगांमध्‍ये उपलब्‍ध आहे. 


ओडीसी रेसर लाइट व्‍ही2 
किंमत – 77,250 रुपये 




इलेक्ट्रिक स्‍कूटर व्‍ही2 मध्‍ये शक्तिशाली व वॉटरप्रूफ मोटर आहे. या स्‍कूटरमधील ड्युअल बॅटरी सिस्‍टमसह तुम्‍ही पॉवर कमी होण्याची चिंता न करता लांबच्‍या प्रवासाचा आनंद घेऊ शकता. हे मॉडेल दोन व्‍हेरिएंट्समध्‍ये येते आणि वापरकर्त्‍यांच्‍या विविध गरजांची पूर्तता करण्‍यासाठी यामध्‍ये सुधारित बॅटरी क्षमता आहे. बेस मॉडेलमध्‍ये लिथियम-आयर्न बॅटरी आहे, जी तीन ते चार तासांमध्‍ये संपूर्ण चार्ज होण्‍याची खात्री देते आणि 75 किमीची रेंज देते. या स्‍कूटरमध्‍ये एलईडी लाईट्स आणि मोठी बूट स्‍पेस आहे, ज्‍यामुळे तुम्‍ही सुरक्षितपणे व सुलभपणे तुमचे सामान स्‍टोअर करु शकता. याव्‍यतिरिक्‍त अँटी-थेफ्ट लॉक स्‍कूटर वापरात नसताना सुरक्षित असण्‍याची खात्री देते. इलेक्ट्रिक स्‍कूटर रेसर लाइट व्‍ही२ आरामदायी व विश्‍वसनीय राइड देते. रॅडियण्‍ट रेड, पेस्‍टल पीच, सफायर ब्‍ल्‍यू, मिंट ग्रीन, पर्ल व्‍हाइट व कोर्बान ब्‍लॅक या आकर्षक रंगांमध्‍ये उपलब्‍ध ही स्‍कूटर निश्चितच रस्‍त्‍यावर सर्वांचे लक्ष वेधून घेईल. 


कायनेटिक ग्रीन झिंग एचएसएस 
किंमत: 84,990 रुपये 




झिंग एचएसएस ही कायनेटिक ग्रीनची शक्तिशाली इलेक्ट्रिक स्‍कूटर आहे. ही स्‍कूटर प्रतितास 60 किमीची अव्‍वल गती आणि प्रतिचार्ज 120 किमीची रेंज देते. या स्‍कूटरमध्‍ये 1.2 केडब्‍ल्‍यू मोटर आणि 60 व्‍होल्‍ट 28 अॅम्पियर ड्युअल बॅटरी आहे. तसेच या स्‍कूटरमध्ये मल्‍टीफंक्‍शनल डॅशबोर्ड, तीन स्‍पीड मोड्स आणि डिटॅचेबल लिथियम-आयर्न बॅटरी आहे, जी फक्‍त 3 तासांमध्‍ये चार्ज होते. अद्वितीय वैशिष्‍ट्ये आहेत स्‍मार्ट रिमोट कीसह अॅण्‍टी-थेफ्ट, कीलेस एण्‍ट्री व चालता-फिरता यूएसबी चार्जिंग पोर्ट. सुलभ रायडिंगकरता डिझाईन करण्‍यात आलेल्‍या या स्‍कूटरमध्‍ये हायड्रॉलिक शॉक अॅब्‍जॉबर्स आणि टेलिस्‍कोपिक सस्‍पेंशन आहे. 


होप इलेक्ट्रिक लिओ इलेक्ट्रिक स्‍कूटर 
किंमत: 84,360 रुपये 




होप इलेक्ट्रिक लिओ ही प्रगत इलेक्ट्रिक स्‍कूटर भारतात दोन व्‍हेरिएंट्समध्‍ये उपलब्‍ध आहे. बेसिक (लो स्‍पीड) व स्‍टॅण्‍डर्ड (हाय पॉवर, लो स्‍पीड). या स्‍कूटरमध्‍ये पोटेण्‍ट बीएलडीसी हब इलेक्ट्रिक मोटर आहे. स्‍टॅण्‍डर्ड मॉडेलमध्‍ये 2.2 केडब्‍ल्‍यू सर्वोच्‍च मोटर आहे आणि जवळपास 120 किमीची उल्‍लेखनीय रेंज देते. स्‍कूटर फक्‍त 2.5 तासांमध्‍ये 0 ते 80 टक्‍क्‍यांपर्यंत चार्ज होते. लिओ एलईडी लायटिंग, एलसीडी इन्‍स्‍ट्रूमेंट क्‍लस्‍टर, रिमोट कीलेस इग्निशन, रिजनरेटिव्‍ह ब्रेकिंग आणि चार ड्रायव्हिंग मोड्स अशा वैशिष्‍ट्यांसह इतरांपेक्षा वरचढ ठरते. उल्‍लेखनीय बाब म्‍हणजे या स्‍कूटरमध्‍ये स्‍मार्टफोन कनेक्टिव्हिटी आहे, ज्‍यामधून चोरी, स्‍पीडिंग असे अनेक अलर्टस् मिळतात. या स्‍कूटरच्‍या शक्तिशाली डिझाईनमध्‍ये टेलिस्‍कोपिक फोर्क, हायड्रॉलिक रिअर शॉक अॅब्‍जॉर्बर व दोन्‍ही चाकांना डिस्‍क ब्रेक्‍स आहेत, ज्‍यामधून सुरक्षिततेची खात्री मिळते, तसेच संयोजित ब्रेकिंग सिस्‍टम आहे. 


ओला एस1 एक्‍स 
किंमत - 89,999 रुपये 




एस1 एक्‍समध्‍ये 2700 वॅट मोटरची क्षमता आहे. ही स्‍कूटर 2 केडब्‍ल्‍यूएच व्‍हर्जनमध्‍ये प्रतितास 85 किमीची अव्‍वल गती प्राप्‍त करते. स्‍कूटर तीन व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये उपलब्‍ध आहे. 2 केडब्‍ल्‍यूएच व्‍हर्जनची किंमत 90,019 रुपये, 3 केडब्‍ल्‍यूएच व्‍हेरिएं‍ट्सची किंमत 99,979 रुपये असण्‍यासह 151 किमीची रेंज व प्रतितास 90 किमीची अव्‍वल गती आहे आणि एस1 एक्‍स प्‍लसची किंमत 1,09,827 रुपये आहे, जी 3 केडब्‍ल्‍यूएच मॉडेलप्रमाणे कार्यक्षमता देते. सर्व व्‍हेरिएंट्सच्‍या दोन्‍ही चाकांमध्‍ये संयोजित ब्रेकिंग सिस्टम आहे आणि बॅटरी 7.4 तासांमध्‍ये पूर्ण चार्ज होऊ शकते. 7 आकर्षक रंगांमध्‍ये उपलब्‍ध असलेली ही स्‍कूटर स्‍टाइलसह कार्यक्षमतेची खात्री देते.