Redmi Note 12 4G: Redmi Note 12 4G फोन लवकरच जागतिक बाजारात लॉन्च केला जाऊ शकतो. यासोबतच आता हा फोन भारतीय बाजारपेठेतही उपलब्ध होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फोन तीन व्हेरियंटमध्ये सादर केला जाईल. याचा टॉप मॉडेल 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह येऊ शकतो.  Redmi Note 12 4G फोन IMEI वेबसाइटवर स्पॉट झाला आहे. यावरून हे दिसून येते की हा फोन लवकरच जागतिक बाजारपेठेसह भारतीय बाजारपेठेतही लॉन्च केला जाऊ शकतो. कंपनीने या मोबाईलमध्ये अनेक नवीन फीचर्स दिले आहेत. Redmi Note सिरीजचा हा नवीन स्मार्टफोन कसा आहे, हे जाणून घेऊ...


या वेबसाइट्सवरही स्पॉट झाला Redmi Note 12 4G 


IMEI वेबसाइट व्यतिरिक्त Redmi Note 12 4G फोन थायलंडच्या नॅशनल ब्रॉडकास्टिंग टेलिकम्युनिकेशन कमिशनच्या वेबसाइटवर देखील दिसला आहे. Xiaomiui च्या रिपोर्टनुसार, Redmi Note 12 4G फोनची टेस्ट Tapas या कोड नावाने केली जात आहे. याशिवाय फोनचे तीन प्रकार IMEI डेटाबेसमध्ये स्पॉट झाले आहेत. ज्यामध्ये मॉडेल क्रमांक 23021RAAEG आणि 23028RA60L दिसू लागले आहेत.


Redmi Note 12 4G ची संभाव्य फीचर्स 


लिस्टिंगवरून मिळालेल्या माहितीनुसार, Redmi Note 12 4G फोन भारतात तीन प्रकारांमध्ये सादर केला जाऊ शकतो. Redmi Note 12 4G फोनमध्ये NFC फीचर दिले जाऊ शकते आणि ते Android 12 आधारित MIUI 14 OS सह येऊ शकते. या फोनमध्ये 4GB RAM + 64GB स्टोरेज मिळू शकते. तसेच  8GB RAM + 128GB स्टोरेज याचा टॉप व्हेरियंटध्ये दिले जाऊ शकते. हा फोन Redmi Note 12 4G, Redmi Note 12 Pro 4G आणि Redmi Note 12 Pro+ 4G या तीन प्रकारांमध्ये पाहायला मिळू शकतो. असं असलं तरी अद्याप कंपनीने याबाबत कोणतीही अधीकृत माहिती जाहीर केलेली नाही आहे. 


1 फेब्रुवारीला सॅमसंगचा इव्हेंट


सॅमसंग 1 फेब्रुवारी 2023 रोजी वर्षातील सर्वात मोठा इव्हेंट करणार आहे. Samsung Galaxy Unpacked Event 2023 असे या इव्हेंटचे नाव आहे. Samsung Galaxy S23 सिरीजसोबत Samsung Galaxy Tab S9, Samsung Galaxy Buds 2 आणि Galaxy Book 3 सारखे गॅझेट देखील इव्हेंटमध्ये लॉन्च केले जातील.