International Yoga Day 2023 : सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे लोकांचं आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. पण दुसरीकडे लोकांमध्ये जागरूकताही वाढत आहे. कारण तुमचं शरीर निरोगी असेल,तर दैनंदिन जीवनातील निम्म्यापेक्षा जास्त समस्या दूर होतात. व्यक्तीचं शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले असेल, तर तो आयुष्यातील सुख-दु:खाला सहज सामोरे जाऊ शकतो. परंतु व्यक्तीचं शरीर व्याधींनी त्रस्त असेल तर अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं. ही समस्याचं निर्माण होऊ नये म्हणून नियमित योगा करायला हवा.  यासाठी कोणताही खर्च करायची  आवश्यकता नाही. तसेच योगा क्लास करण्यासाठी कोणत्याही ट्रेनिंग सेंटरला जाण्याची गरज नाही. कारण सध्याचा काळ विज्ञान व तंत्रज्ञानाचा आहे. त्यामुळे तुमच्या मोबाईलवरून बरीच कामे करता येऊ शकतात. आज आंतरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day) आहे. यानिमित्ताने आपण काही योगा फिटनेस अॅप्सविषयी सविस्तर घेऊया.


 तुम्हाला घरी बसल्या बसल्या योगा शिकण्यासाठी मदत होणार आहे. यातील काही योगा अॅप्समध्ये तुम्हाला व्हिडीओ, तुमच्या वयोगटानुसार वेगवेगळे योगा टीचर आणि दररोजचा योगा व्यायाम याप्रकारच्या काही सुविधा मिळू शकतात. जर तुम्हाला योगा टीचरची गरज असेल, तर याचं अॅप्सवरून बुकिंगही करू शकता. 


या अॅप्सचा उपयोग करा आणि योगा शिका व फिट राहा 


हे सर्व योगा फिटनेस अॅप्स तुमच्या स्मार्टफोनमधील प्ले स्टोरवर उपलब्ध आहेत. या प्ले स्टोरवर जा आणि तुमच्या आवडीचे अॅप्स डाऊनलोड करा. 


Daily Yoga Fitness+Meditation : या योगा अॅपला एक कोटींपेक्षा जास्त लोकांनी डाऊनलोड केलं आहे. या अॅपच्या माध्यामातून तुम्ही योगा करू शकता. यासोबत तुमचं शरीर योग्य सुडोल आणि योग्य शेपमध्ये आणण्यासाठी त्यासंबंधित योगा स्टेप करू शकता. या अॅपमध्ये तुम्हाला योगा क्लासेस आणि जागतिक दर्जाचे योगा शिक्षक मार्गदर्शन करतात.


Yoga For Kids Family Fitness :  हे तुमच्या कुटुंबातील लहान मुलांसाठी तयार करण्यात आलेलं अॅप आहे. या अॅपला आतापर्यंत 50 लाखापेक्षा जास्त लोकांनी  डाऊनलोड केलं आहे. या अॅपला 4.4 इतकं रेटींग आहे.या अॅपमध्ये लहान मुलांसाठी योगा प्लॅनही देण्यात आला. यासाठी तुम्हाला  सोपं, मध्यम आणि अवघड इत्यादी योगा प्रकारचा पर्याय दिला आहे. यातील एका पर्यायाची निवड करून योगा करता येणार आहे.


याशिवाय तुम्हाला इतरही योग अॅप्स तुमच्या स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड करता येऊ शकतात. यामध्ये yog4Lyf, yoga daily workout Weight loss  आणि  yoga daily workout Meditation  सारखे अॅप्स उपलब्ध आहेत. हे सर्व अॅप्स फ्रीमध्ये डाऊनलोड करता येणार आहेत. जर तुम्हाला एखाद्या योगासनाचा प्रकार करायला अवघड जात असेल, तर तुम्ही युट्युबवरील व्हिडीओजची मदत घेऊ शकता. परंतु योगासन करण्याआधी काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. जसे की, तुमचं शारीरिक आरोग्य आणि  क्षमता लक्षात घेऊन योगासन करा. यासाठी तुम्ही एखाद्या योगा शिक्षक किंवा मार्गदर्शकाचा सल्ला घेऊ शकता. 


इतर महत्त्वाच्या बातम्या वाचा :


International Yoga Day 2023 : ब्लड प्रेशर, डायबिटीजवर रामबाण उपाय ठरतील 'ही' 3 योगासनं; दिवसभरात फक्त 15 मिनिटं काढा अन् नक्की ट्राय करा