Realme C55 Price In India : Real Me ने भारतात आपला बजेट स्मार्टफोन लॉन्च केला आहे. तुम्ही Realme C55 4/64GB, 6/64GB आणि 6/128GB मध्ये खरेदी करू शकता. स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 64-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि मिनी कॅप्सूल फीचर मिळत आहे. ही मिनी कॅप्सूल हुबेहुब आयफोनच्या डायनॅमिक आयलंड फीचर्ससारखी आहे. नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमात कंपनीने हा स्मार्टफोन लॉन्च केला. तत्पूवी मागील महिन्यात Realme ने Realme C33 स्मार्टफोन बाजारात लॉन्च केला होता.


Realme C55 Price In India : किती आहे किंमत?


Realme C55 ची 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपये आहे, 6GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 11,999 रुपये आहे. तर 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 13,999 रुपये आहे. स्मार्टफोनची विक्री 28 मार्च रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल. ग्राहक सध्या फ्लिपकार्टच्या माध्यमातून स्मार्टफोन ऑर्डर करू शकतात. तुम्ही Realme च्या अधिकृत वेबसाइट फ्लिपकार्टद्वारे मोबाइल फोन खरेदी करू शकता.


Realme C55 Price In India : इतक्या हजारांची मिळत आहे सूट 


तुम्ही HDFC बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे स्मार्टफोन खरेदी केल्यास तुम्हाला 1,000 रुपयांची सूट मिळेल. याशिवाय मोबाईल फोनच्या प्री-बुकिंगवर 1,000 रुपयांची एक्स्चेंज डिस्काउंटही दिली जात आहे. अशा प्रकारे तुम्ही नवीन मोबाईल फोनवर 2,000 रुपयांपर्यंत बचत करू शकता. Realme C55 बद्दल कंपनीने दावा केला आहे की. हा फक्त 29 मिनिटांत 50% चार्ज होतो.


Realme C55 Price In India : स्पेसिफिकेशन 


Realme C55 मध्ये ग्राहकांना 6.72-इंचाचा डिस्प्ले मिळतो. जो 90hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या मोबाईलमध्ये आयफोनप्रमाणेच मिनी कॅप्सूल फीचर देण्यात आले आहे, जे तुम्ही सेटिंगमध्ये जाऊन चालू करू शकता. तुम्ही सनसेव्हर आणि रेनी नाईट रंगांमध्ये मोबाईल फोन खरेदी करू शकाल. स्मार्टफोनमध्ये 64-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. Realme चा हा आतापर्यंतचा सर्वात स्लिम स्मार्टफोन आहे. जो 7.9 मिमीसह येतो.


Poco C55 स्वस्तात करू शकता खरेदी 


तुम्ही 10,000 रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये तुमच्यासाठी परवडणारा फोन शोधत असाल तर Poco C55 तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. फ्लिपकार्टवर 8,749 रुपयांच्या बेस व्हेरिएंटसह मोबाईल फोन दोन स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. स्मार्टफोनमध्ये 5000 mAh बॅटरी, 50 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा आणि 6.71 इंच HD डिस्प्ले आहे.