Nokia C12 एंट्री-लेव्हल स्मार्टफोनची घोषणा केल्यानंतर HMD Global ने Nokia C12 Pro नावाच्या नवीन बजेट फोनची घोषणा केली आहे. नावावरूनच माहीत पडतं की हा फोन Nokia C12 चा प्रो व्हर्जन आहे. हा प्रो व्हर्जन ऑक्टा-कोर प्रोसेसर, 2GB व्हर्च्युअल रॅम सपोर्ट, नाईट आणि पोर्ट्रेट कॅमेरा मोडसह येतो. याशिवाय फोनमध्ये अनेक फीचर्स देखील दिले जाऊ शकतात. विशेष म्हणजे इतक्या फीचर्सनंतरही फोनची किंमत किफायतशीर (cheapest phone in india) आहे. या स्मार्टफोनबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ..
Nokia C12 Pro ची किंमत आणि उपलब्धता
Nokia C12 Pro च्या बेस मॉडेलची किंमत 6,999 रुपये आहे, ज्यामध्ये 2GB RAM + 2GB व्हर्च्युअल रॅम (Mobile Ram) आणि 64GB अंतर्गत स्टोरेज उपलब्ध आहे. दुसरे मॉडेल 3GB RAM + 2GB व्हर्च्युअल रॅम आणि 64GB अंतर्गत स्टोरेजसह 7999 रुपयांच्या किंमतीत येते. हा फोन तीन रंगांच्या पर्यायांसह सादर करण्यात आला आहे. ज्यामध्ये लाइट मिंट, चारकोल आणि डार्क सायन यांचा समावेश आहे. हा स्मार्टफोन रिटेल स्टोअर्स, ई-कॉमर्स वेबसाइट आणि Nokia.com वर उपलब्ध असेल.
Nokia C12 Pro चे स्पेसिफिकेशन
- डिस्प्ले: 6.3-इंच HD+ डिस्प्ले
- मागील कॅमेरा: 8-मेगापिक्सेल
- सेल्फी कॅमेरा: 5-मेगापिक्सेल
- बॅटरी: 4,000mAh
फोनची किंमत खूप कमी आहे. परंतु असे असूनही नोकिया C12 प्रो मध्ये नाईट आणि पोर्ट्रेट सारखे कॅमेरा मॉडेल्स देण्यात आले आहेत. Phone Plus Android 12 (Go Edition) सॉफ्टवेअरवर चालतो. फोनमध्ये व्हर्च्युअल रॅमचे फीचर्स आहेत. ज्यामुळे एकाधिक अॅप्समध्ये स्विच करणे देखील सोपे होते. HMD Global ने खुलासा केला आहे की, फोन किमान दोन वर्षांच्या नियमित सुरक्षा पॅचसह येईल. कंपनी 12 महिन्यांच्या रिप्लेसमेंट गॅरंटीसह Nokia C12 Pro ऑफर करण्याचे आश्वासन देत आहे.
iQOO Z7 ची विक्री झाली सुरू
iQOO Z7 आज (21 मार्च 2023) लॉन्च आणि विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. iQOO Z7 दोन स्टोरेज प्रकारांमध्ये सादर करण्यात आला आहे. ज्यामध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह बेस व्हेरिएंटची किंमत 18,999 रुपये आहे. याशिवाय 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत 19,999 रुपये आहे.
इतर महत्वाची बातमी :