Poco X6 Neo Smartphone Launched in India : Poco ने भारतात नवीन स्मार्टफोन (Smartphone) लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनचे नाव Poco X6 Neo आहे. या स्मार्टफोनची मार्केटमध्ये बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत होती. आज अखेर कंपनीने हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या फोनमध्ये कंपनीने 120Hz रिफ्रेश रेटसह OLED डिस्प्ले, 108MP कॅमेरा सेटअप, MediaTek Dimension 6080 चिपसेटसह अनेक खास फीचर्स दिले आहेत. कंपनीने हा फोन मिडरेंज किंमतीत लॉन्च केला आहे. या फोनच्या सर्व स्पेसिफिकेशन्स, कॅमेरा आणि किंमतीबद्दल जाणून घेऊयात. 


Poco X6 Neo चे स्पेसिफिकेशन्स


डिस्प्ले : या स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाची FHD+ OLED 10bit स्क्रीन आहे. त्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. ही स्क्रीन 1000 nits पीक ब्राइटनेस आणि गोरिला ग्लास 5 संरक्षणासह येते.


बॅक कॅमेरा : या फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा मुख्य कॅमेरा 108MP आहे आणि दुसरा कॅमेरा 2MP आहे.


फ्रंट कॅमेरा : या फोनच्या पुढील भागात सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP फ्रंट कॅमेरा आहे.


प्रोसेसर : या फोनमध्ये प्रोसेसरसाठी 6nm octa core MediaTek Dimensity 6080 चिपसेट आहे, जो ग्राफिक्ससाठी Mali-G57 MC2 GPU सह येतो.


रॅम आणि स्टोरेज : RAM साठी LPDDR4x आणि स्टोरेजसाठी UFS 2.2 वापरले गेले आहे.


ऑपरेटिंग सिस्टम : हा फोन सध्या Android 13 वर आधारित MIUI 14 वर चालतो, तर आजकाल बरेच फोन Android 14 वर आधारित OS वर चालायला लागले आहेत.


बॅटरी : या फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAn बॅटरी आहे.


डिझाईन : या फोनची रुंदी फक्त 6.79mm आहे, तर वजनही फक्त 175 ग्रॅम आहे. यामुळे हा अतिशय स्लिम फोन असल्याचा कंपनीचा दावा आहे.


कनेक्टिव्हिटी : या फोनमध्ये ब्लूटूथ व्हर्जन 5.3, वायफाय 5, 3.5 मिमी ऑडिओ जॅक सारखे अनेक विशेष कनेक्टिव्हिटी फीचर्स देखील दिले गेले आहेत.


इतर फीचर्स : या फोनच्या इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, यात IP54 रेटिंग, सिंगल स्पीकर आणि साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर यांसारखी अनेक खास वैशिष्ट्ये आहेत.


किंमत किती असेल? 


कंपनीने हा स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च केला आहे. पहिला व्हेरिएंट 8GB + 128GB आहे, ज्याची किंमत 15,999 रुपये आहे. तर, दुसरा व्हेरिएंट 8GB + 256GB आहे, ज्याची किंमत 17,999 रुपये आहे. कंपनीने लॉन्च ऑफर म्हणून या स्मार्टफोनवर 1000 रुपयांची झटपट सूट दिली आहे.पण, त्यासाठी यूजर्सना हा स्मार्टफोन ICICI बँक कार्डद्वारे पेमेंट करून खरेदी करावा लागेल. अशा वेळी, दोन्ही व्हेरिएंट अनुक्रमे 14,999 रुपये आणि 16,999 रुपयांना उपलब्ध असतील. या स्मार्टफोनची विक्री फ्लिपकार्ट आणि पोको स्टोअर्सवर 18 मार्च रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होईल.


महत्त्वाच्या बातम्या :


फोन पाण्यात भिजला तर तांदळात सुकवायचा का? फायदा होईल की तोटा? जाणून घ्या