Poco C55 Sale : Poco चा नवीन लॉन्च झालेला स्मार्टफोन Poco C55 आता भारतात विक्रीसाठी उपलब्ध आहे. जर तुम्ही बजेट स्मार्टफोन शोधत असाल तर हा फोन तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. या फोनच्या सेलबद्दल बोलायचे झाले तर हा फोन आता फ्लिपकार्टवर सेलसाठी लिस्ट झाला आहे. हा एक 4G डिव्हाइस आहे. जर तुम्ही 5G डिव्हाइस शोधत असाल तर हा तुमच्यासाठी चांगला पर्याय नाही. जर तुमच्यासाठी बजेटला प्राधान्य असेल, तर हा फोन 10,000 रुपयांच्या सेगमेंटमध्ये आहे आणि सध्या या सेगमेंटमध्ये 5G फोन लॉन्च होणे कठीण आहे. कंपनीच्या या फोनमध्ये काय आहे खास, हे जाणून घेऊ...
Poco C55 फीचर्स
- डिस्प्ले: 6.71-इंच IPS LCD डिस्प्ले, HD+ रिझोल्यूशन
- प्रोसेसर: MediaTek Helio G85 SoC
- RAM आणि स्टोरेज: 6GB RAM आणि 128GB पर्यंत स्टोरेज
- ऑपरेटिंग सिस्टम: MIUI 13, Android 12 OS
- मागील कॅमेरा: 50 मेगापिक्सेल ड्युअल कॅमेरा सेटअप
- सेल्फी कॅमेरा: 5 मेगापिक्सेल
- बॅटरी: 5,000mAh बॅटरी
- चार्जिंग: 10W चार्जिंग
Poco C55 मध्ये 20:9 आस्पेक्ट रेशो असलेला डिस्प्ले आहे. या डिव्हाइसमध्ये स्क्रॅच-प्रूफ स्क्रीन असल्याचा कंपनीचा दावा आहे. फोनला वॉटर प्रोटेक्शनसाठी IP52 रेटिंग देखील मिळाली आहे. कंपनीने फोनमध्ये मायक्रोएसडी कार्ड स्लॉटही दिला आहे. बजेट Poco फोनमध्ये पोर्ट्रेट मोड, नाईट मोड, टाइम लॅप्स, HDR मोड आणि अनेक कॅमेरा फीचर्स देण्यात आले आहेत. फोनमध्ये रियर-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देखील देण्यात आला आहे.
Poco C55 किंमत
Poco C55 हा 4G स्मार्टफोन आहे आणि याची किंमत 10 हजारांपेक्षा कमी आहे. फोनची किंमत 8,499 रुपये आहे. ही किंमत फोनच्या 4 GB RAM + 64 GB स्टोरेज मॉडेलसाठी आहे. यासोबतच फोनच्या 6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपये आहे. कलर ऑप्शनबद्दल बोलायचे झाले तर फोन फॉरेस्ट ग्रीन, कूल ब्लू आणि पॉवर ब्लॅक कलरमध्ये सादर करण्यात आला आहे.
Xiaomi 13 Lite लॉन्च
चीनची प्रसिद्ध मोबाइल कंपनी Xiaomi ने Xiaomi 13 सीरीज मोबाईल लॉन्च केला आहे. या अंतर्गत कंपनीने Xiaomi 13, Xiaomi 13 Pro आणि Xiaomi 13 Lite लॉन्च केले आहेत. Xiaomi 13 Lite दोन फ्रंट कॅमेऱ्यांसह येतो आणि याचा लूक आयफोन 14 प्रो सारखा दिसतो. 8 मार्चपासून ग्लोबली स्मार्टफोनची विक्री सुरू होणार आहे.
इतर बातमी:
Nokia New Logo: नोकियाने 60 वर्षात पहिल्यांदाच बदलला लोगो, कंपनीने केली मोठी घोषणा; जाणून घ्या