Paytm Soundbox : आजकाल अनेक व्यवहार हे यूपीआयच्या (UPI) या काळात अनेक छोट्यापासून ते मोठ्या गोष्टींसाठी आपण ऑनलाईन पेमेंट (Online Payment) करतो. याचं कारण म्हणजे ही प्रक्रिया अगदी सहज आणि सोपी आहे. UPI च्या माध्यमातून आपण चहा विक्रेत्यापासून ते भाजी विक्रेत्यांपासून भाजी विक्रेत्यांपर्यंत सर्वांना ऑनलाईन पैसे देऊ शकतो. अनेकदा दुकानात, किंवा भाजी विक्रेत्याकडे ऑनलाईन पेमेंट करताना तुम्ही एक मोठा आवाज ऐकला असेल. यामध्ये तुम्हाला किती पैसे मिळाले आहेत याची माहिती मिळते. हा आवाज एकदा ऐकू आल्यानंतर तुम्हाला मोबाईल (Mobile) दुकानदाराला दाखवण्याची गरज भासत नाही. पण, तुम्हाला माहीत आहे का दुकनदारांकडे हा साऊंड बॉक्स कसा मिळतो? त्याची किंमत किती आहे? याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.

  


पेटीएम साउंड बॉक्सची सुविधा


पेटीएम व्यतिरिक्त, इतर अनेक UPI ॲप्सनी देखील त्यांचे स्वत:चे असे साऊंड बॉक्स लॉन्च केले आहेत. साऊंड बॉक्सच्या या सुविधेमुळे सर्वात जास्त मदत जे फार शिकलेले नाहीत, ज्यांना लिहीता-वाचता येत नाही अशा लोकांना मिळते. तसेच, काही जण मोबाईलवर जे पेमेंट दाखवतायत ते खरं आहे की नाही हे देखील तपासण्यासाठी हे अॅप आपल्याला उपयोगी ठरते. त्यामुळे भाजी विक्रेत्यांपासून ते एसी विकणाऱ्या दुकानांपर्यंत सर्वजण या साउंड बॉक्सचा वापर करतायत. 


साऊंड बॉक्सची किंमत नेमकी किती?  


पेटीएमचे साउंड बॉक्स अनेक प्रकारचे येतात. काही साऊंड बॉक्स फक्त पेमेंटची माहिती देतात. तर काही म्युझिकची सुविधा देखील देतात. या साऊंड बॉक्सची सुरुवातीची किंमत 999 रुपये आहे, जी दुकानदार अगदी सहज देखील घेऊ शकतात. तुम्ही हा साउंड बॉक्स पेटीएम ॲपवर फक्त 49 रुपयांमध्ये खरेदी करू शकता, पण, यासाठी तुम्हाला दरमहा 150 रूपये ही एक निश्चित रक्कम भरावी लागेल. त्याचप्रमाणे, तुम्ही त्यांचा साउंड बॉक्स इतर UPI ॲप्सद्वारे देखील मिळवू शकता. 


या साऊंड बॉक्सच्या बॅटरीची शेल्फ लाईफ साधारण सात दिवसांची असते. याशिवाय, यात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि 4G सपोर्ट देखील आहे. मात्र, आता त्याचे अनेक वेगवेगळे व्हर्जन लाँच करण्यात आले असून, त्यात अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जात आहेत. हा साऊंड बॉक्स तुम्ही देखील खरेदी करू शकता. 


महत्त्वाच्या बातम्या :


Paytm FASTag वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी! 15 मार्चनंतर फास्टॅगचे रिचार्ज होणार नाही; 'या' 39 बँकांवर होऊ शकतात शिफ्ट