Oppo Reno 8T: चीनी मोबाईल फोन निर्माता कंपनी Oppo ने Reno 8T 5G लॉन्च करण्याची तारीख जाहीर केली आहे. हा स्मार्टफोन भारतात 3 फेब्रुवारीला लॉन्च होणार आहे. कंपनीने सोशल मीडियाद्वारे ही माहिती शेअर केली आणि सांगितले आहे की, ग्राहक हा स्मार्टफोन ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट आणि ओप्पो चॅनेलद्वारे खरेदी करू शकतील. स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.7-इंच स्क्रीन आणि 108-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळेल. या स्मार्टफोनची किंमत किती असेल, यामध्ये कंपनी कोणते नवीन फीचर्स देणार आहे, याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ...


Oppo Reno 8T स्पेसिफिकेशन 


कंपनी Oppo Reno 8T ला 2 व्हेरियंट 4G आणि 5G मध्ये लॉन्च करेल. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरचा सपोर्ट मिळेल. मोबाईल फोनची स्क्रीन 6.67 इंच आहे, जी 120hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला या मोबाईल फोनमध्ये 108-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा मिळेल, तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फ्रंटमध्ये 32-मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. या स्मार्टफोनमध्ये 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी 67W चार्जिंगला सपोर्ट करेल. मोबाईल फोनमध्ये 8GB रॅम आणि 256GB अंतर्गत स्टोरेज मिळेल.


Oppo Reno 8T: किंमत 


Oppo Reno 8T ची किंमत जवळपास 30,000 रुपये असू शकते. याबाबतची माहिती अद्याप अधिकृतरित्या समोर आलेली नसली तरी इंटरनेटवर चर्चा आहे की, हा मोबाईल फोन या किंमतीच्या रेंजमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. Oppo India ने एक ट्वीट देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये रणबीर कपूर या फोनचे प्रमोशन करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तो एका व्यक्तीचा फोन कसा घेतो आणि फेकून देतो. यानंतर तो त्याला त्याऐवजी नवीन फोन देतो, हा फोन Oppo Reno 8T आहे.


OnePlus 7 फेब्रुवारीला अनेक गॅजेट्स लॉन्च करणार 


चिनी मोबाईल फोन निर्माता OnePlus 7 फेब्रुवारी रोजी बाजारात अनेक गॅजेट्स लॉन्च करणार आहे. या इव्हेंटमध्ये कंपनी दोन नवीन फोन OnePlus 11 5G आणि OnePlus 11R सादर करेल. हे दोन्ही प्रीमियम मोबाइल फोन असतील ज्यांची किंमत 45,000 ते 55,000 रुपये असू शकते. असं असलं तरी कंपनीने अद्याप अधिकृतपणे याची किंमत जाहीर केलेली नाही.


इतर महत्वाच्या बातम्या: 


What is GB WhatsApp : डिलीट केलेले मेसेजही 'या' व्हॉट्सअॅपवरून वाचता येतात, GB WhatsApp तुमच्यासाठी किती आहे सुरक्षित?