मुंबई : डीपफेकचा (Deep Fake) वापर करुन सध्या अनेकांची बदनामी केल्याच्या घटना घडत आहे. नुकतीच अभिनेत्री रश्मिका मंदानाचा या डीपफेकचा शिकार झाली होती. पण आता याचा वापर करुन सर्वसामान्य नागरिकांची आणि कंपन्यांचीही फसवणूक होत आहे. अशीच एक घटना हाँगकाँगमध्ये (Hong kong) घडली आहे. या  या डीपफेक घोटाळ्यात एका मल्टिनॅशलन कंपनीला 25 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे  207.6 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. 


एखादी कंपनी डीपफेक व्हिडिओचा शिकार होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामध्ये कंपनीच्या अनेक कर्मचाऱ्यांचे डीपफेक व्हिडिओ बनवण्यात आले होते. त्यानंतर त्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना टार्गेट करून त्यांची फसवणूक करण्यात आली. नेमकं प्रकरण काय याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात. 


कंपनीतील मोठ्या अधिकाऱ्यांचे बनवले डीपफेक व्हिडिओ?


हॅकर्सनी  कंपनीच्या हाँगकाँग शाखेतील कर्मचाऱ्यांना टार्गेट करत डीपफेकचा वापर केल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी कंपनीच्या मुख्य फायनान्स अधिकारी आणि इतर अनेक कर्मचाऱ्यांचे डीपफेक व्हिडिओ तयार केले. त्यानंतर एका व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना सामील करण्यात आले होते. ज्यामध्ये या अधिकाऱ्याला काही पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले. या व्हिडिओ कॉलमध्ये फायनान्स अधिकारी सोडला तर इतर सर्व कर्मचारी हे खोटे होते. म्हणजेच प्रत्येकचा डीपफेक व्हिडिओ तयार करण्यात आला होता. यासाठी स्कॅमर्सनी सोशल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओ आणि इतर फुटेजचा वापर केला. जेणेकरून मीटिंगमध्ये उपस्थित असलेली प्रत्येक व्यक्ती खरी वाटली.


पोलिसांकडून तपास सुरु


सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे. हाँगकाँगमधील ही पहिलीच घटना आहे. ज्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात स्कॅम झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. पण या प्रकरणी पोलिसांनी कंपनी आणि कर्मचाऱ्यांची कोणतीही माहिती दिलेली नाही. मागील काही दिवसांपासून डीपफेक तंत्रज्ञान चर्चेत आहे. पण आता डीपफेकमुळे एका कंपनीला एवढा मोठा फटका बसला असल्याचं सांगण्यात येत आहे. 


वेगवेगळ्या खात्यांमधून केले व्यवहार


हाँगकाँगमध्ये झालेल्या या फसवणुकीची माहिती शाखेच्या वित्त विभागाने पोलिसांना दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्याने कॉल दरम्यान दिलेल्या माहितीचे पालन केले. त्याने 5 वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये 15 व्यवहार करून 200 दशलक्ष हाँगकाँग डॉलर्स ट्रान्सफर केले. याबाबत कर्मचाऱ्याने कंपनीच्या मुख्यालयात चौकशी केली असता हा स्कॅम झाल्याची माहिती समोर आली. रश्मिका मंदान्नाचा डीपफेक व्हिडिओ समोर आल्यानंतर भारतात डीपफेकची चर्चा सुरू झाली. पॉप स्टार टेलर स्विफ्टचा एक डीपफेक फोटोही व्हायरल झाला आहे. तेव्हापासून जगभरातून डीपफेकबाबत कडक कायदे करण्याची मागणी केली जातेय. 


ही बातमी वाचा : 


OnePlus 12R खरेदीवर भन्नाट ऑफर, 'ही' गोष्ट मिळणार फोनसोबत मोफत, जाणून घ्या सविस्तर