Bike taxi Service banned: ज्या लोकांकडे स्वतःचे वाहन नाही किंवा ज्या लोकांना वाहन खरेदी करणे शक्य नाही, असे लोक बऱ्याचदा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी ओला, उबेर किंवा रॅपिडोचा वापरतात. तुम्हीही या तीनपैकी कोणत्याही कंपनीची सेवा घेत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता तुम्ही Ola, Uber आणि Rapido मध्ये बाईक टॅक्सी सेवा बुक करू शकणार नाही. दिल्ली परिवहन विभागाने या तीन कंपन्यांना आजपासून त्यांची बाईक टॅक्सी सेवा बंद करण्याची नोटीस दिली आहे.
दिल्लीसारख्या गजबजलेल्या शहरात एखाद्या व्यक्तीला कमी पैशात ऑफिसला किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावे लागते, तर तो अनेकदा ओला, उबेर किंवा रॅपिडो वरून बाईक बुक करतो. जेणेकरून पैशांची बचत होईल आणि तो वेळेत हव्या त्या ठिकाणी पोहोचू शकेल. मात्र आता दिल्ली परिवहन विभागाने ही पॉकेट फ्रेंडली सेवा बंद केली आहे. कारण या तिन्ही कंपन्या वाहतूक नियमांचे उल्लंघन करत होत्या. ग्राहक ज्या बाईकमधून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात होता, त्या व्यावसायिक नसून खासगी नंबरच्या बाईक होत्या. दिल्ली परिवहन विभागाने सांगितले की, असे करणे म्हणजे मोटार वाहन कायदा 1998 चे उल्लंघन आहे, त्यामुळे या तिघांची दुचाकी सेवा तात्काळ प्रभावाने बंद करण्यात आली आहे.
Bike taxi Service banned: नियम मोडल्याबद्दल होऊ शकतो तुरुंगवास
आजपासून कोणताही बाईक टॅक्सी (Bike Taxi) चालक दिल्लीत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवासी घेऊन जाताना दिसला, तर परिवहन विभाग आधी 50 रुपयांचे चलान कापणार. याशिवाय चालकाचा परवाना 3 वर्षांसाठी रद्द होऊ शकतो. त्याचप्रमाणे ज्या कंपनीचा बाईक ड्रायव्हर चालवत असेल किंवा तो ज्या कंपनीत काम करतो, त्या कंपनीला यासाठी एक लाख रुपये दंड भरावा लागेल.
Bike taxi Service banned: रॅपिडोच्या सेवेवर महाराष्ट्रातही बंदी
त्यामुळे आता कमी पैशात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचे असेल तर तुम्हाला एकतर या कंपन्यांची ऑटो सेवा घ्यावी लागेल किंवा सामान्य कार (मिनी) घ्यावी लागेल. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने रॅपिडोच्या सेवेवर महाराष्ट्रातही बंदी घातली आहे, कारण कंपनी परवान्याशिवाय काम करत होती.
इतर महत्वाची बातमी: