Apple to Android : अँड्रॉइड फोनमधून अॅपलच्या फोनमध्ये डेटा स्विच करण्यासाठी बऱ्याच अडचणी येतात. कारण या दोन्ही फोनमध्ये बराच फरक आहे. त्यासाठी  अॅपलने त्यांचे Move to iOS हे फिचर लॉन्च केले आहे. या फिचरच्या मदतीने तुम्हाला आता अँड्रॉइड फोनमधून तुमचा डेटा अॅपलच्या फोनमध्ये घेण्यास फायदा होणार आहे.पण आता हे फिचर कसं वापरायचं हा प्रश्न युजर्सना पडला असेल. पण काही सोप्या पद्धतीने तुम्ही हे फिचर वापरू शकता. 


असं वापराल 'Move to iOS' हे फिचर


सुरुवातीला तुमच्या Android डिव्हाइसवर  Wi‑Fi चालू करा. त्यामुळे तुम्हाला डेटा स्विच करण्यासाठी अडचण निर्माण होणार नाही. त्यानंतर तुमचे नवीन iOS डिव्हाइस आणि तुमचे Android डिव्हाइस पॉवरमध्ये प्लग करुन घ्या. त्यामुळे तुम्हाला डेटा स्विच करण्यास मदत होईल. तुम्ही जो डेटा स्विच करत आहात तो तुमच्या अॅपलच्या फोनमध्ये फिट होईल याची देखील खात्री करुन घ्यावी लागेल. त्यानंतर तुमचे क्रोम देखील अपडेट करुन घ्या. 


आधी नवीन Apple डिव्हाइस चालू करावे लागेल. त्यानंतर ते तुमच्या Android डिव्हाइसजवळ ठेवा. त्यानंतर तुमच्या Apple डिव्हाइसवर येणाऱ्या सूचनांचे तुम्हाला पालन करावे लागेल. त्यानंतर क्विक स्टार्ट स्क्रीनवर जाऊन स्क्रीनवरील सूचनांचे पालन करा. त्यानंतर सीमकार्ड सुरु करण्याचा पर्याय तुमच्या स्क्रीनवर येऊ शकतो. 


त्यानंतर जो डेटा स्विच करायचा आहे तो सिलेक्ट करा. आणि Android वर देखील तुमचा डेटा सिलेक्ट करुन घ्या. नंतर Android डिव्हाइसवर Move to iOS हे अॅप डाऊनलोड करुन घ्या आणि ते ओपन करा.   त्यानंतर तुम्हाला Continue असा ऑप्शन येईल. त्यावर क्लिक करावे लागेल. आता तुम्हाला एका दहा अंकी किंवा सहा अंकी कोड येईल. तो कोड तुम्ही तुमच्या Android फोनमध्ये टाका. त्यानंतर तुमच्या  iOS वर तात्पुरते Wi-Fi नेटवर्क जोडण्याच्या सूचना येतील. ते  Wi-Fi नेटवर्क जोडून झाल्यानंतर तुम्हाला तुमचा डेटा स्विच करता येईल. 


सध्या Android मोबाईल फोन सोडून Apple डिव्हाइससाठी स्विच करणारे अनेक युजर्स असतात. अशावेळी त्यांचा महत्त्वपूर्ण डेटा त्यांच्या Android मोबाईलमध्ये असू शकतो. त्यामुळे आता असा महत्त्वपूर्ण डेटा तुम्हाला स्विच करण्यासाठी Move to iOS हे फिचर उपयुक्त ठरणार आहे. 


हे ही वाचा :


जगातील सर्वात स्लिम फ्लिप फोन, आज Motorola Razr 40 Series लाँच होणार; किंमत काय जाणून घ्या...