Upcoming Phones : बाजारात नवीन अॅपलच्या वेगवेगळ्या मॉडेलचे फोन आले तरी मात्र स्मार्टफोनची मागणी बाजारात कमी झालेली नाही. यावर्षी अनेक स्मार्टफोन निर्माता कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक नवीन स्मार्टफोन बाजारात आणले. गेल्या काही महिन्यांत सॅमसंग आणि शाओमी सारख्या मोठ्या कंपन्यांचे फोनही बाजारात लॉन्च झाले आहेत. आता नथिंग आणि मोटोरोलासह इतर कंपन्या देखील लवकरच नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहेत. या स्मार्टफोनचं नेमकं वैशिष्ट्य काय ते जाणून घेऊयात.  


सॅमसंग झेड फोल्ड 5 (Samsung Galaxy Z Fold 5)


सॅमसंगने फोल्डेबल आणि फ्लिप स्मार्टफोनच्या जगात आपलं वेगळं नाव मिळवलं आहे. कंपनी आता आपला फ्लॅगशिप फोल्डेबल Z Fold 5 जुलैच्या अखेरीस होणाऱ्या अनपॅक्ड इव्हेंटमध्ये लॉन्च करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Z Fold 5 मध्ये नवीन डिझाइन दिले जाण्याची अपेक्षा आहे. यामुळे स्मार्टफोनची रूंदी कमी होईल. यात OLED स्क्रीन, Snapdragon 8 Gen 2 चिपसेट आणि अंडर-डिस्प्ले सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. 


सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप 5 (Samsung Galaxy Z Flip 5)


सॅमसंगचा फ्लिप स्मार्टफोन आपल्या कॉम्पॅक्ट डिझाइन आणि कमी किंमतीमुळे ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. Galaxy Z Flip 5 ला मोठा कव्हर डिस्प्ले मिळण्याची अपेक्षा आहे. आगामी स्मार्टफोनचा लूक आणि डिझाइन फ्लिप 4 प्रमाणेच राहण्याची अपेक्षा आहे. यामध्ये Snapdragon 8 Gen 2 चिपसेट देखील दिला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन 8GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेजसह प्रायमरी मॉडेलसह येईल. 


Nothing Phone(2)


Nothing ने आपल्या पहिल्या स्मार्टफोनमध्ये लायटिंग डिझाईन देऊन अनेक ग्राहकांना आकर्षित केलं. आता Nothing (2) Snapdragon 8+ Gen 1 चिपसेटसह 45,000 रुपयांच्या अंदाजे किंमतीला लॉन्च केला जाण्याची शक्यता आहे. कंपनीने असेही म्हटले आहे की, Nothing Phone(2) नथिंग OS (2) त्याच्या मागील बाजूस एक चांगली ग्लिफ लाइटिंग देणार आहे. तसेच, यात उत्कृष्ट ड्युअल कॅमेरा मॉडेलसह प्रायमरी कॅमेरा दिला जाण्याची अपेक्षा आहे.


Motorola Razr 40 आणि Razr 40 Ultra


Motorola ने Razr 40 आणि Razr 40 Ultra भारतात लॉन्च केल्याची घोषणा केली आहे. मोटोरोलाचे हे दोन्ही फोल्डेबल स्मार्टफोन नवीन डिझाइनसह आले आहेत. हे स्मार्टफोन अॅमेझॉनवर उपलब्ध असतील. Razr 40 Ultra मध्ये 3.6-इंचाचा pOLED कव्हर डिस्प्ले असेल आणि हा जगातील सर्वात स्लिम फ्लिप स्मार्टफोन म्हणून ओळखला जातो. 


iQoo निओ 7 प्रो (iQOO Neo 7 Pro)


iQoo Neo 7 Pro हा ड्युअल चिप स्मार्टफोन आहे. यात स्नॅपड्रॅगन 8+ जनरल 1 चिपसेटसह गेमिंग चिप देखील आहे. यामध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट आणि 120 Hz डिस्प्ले दिला जाईल. iQoo चा हा स्मार्टफोन Funtouch OS वर आधारित असेल. भारतातील 8+ Gen 1 चिपसेटवर आधारित हा सर्वात स्वस्त स्मार्टफोन मानला जातो. हा स्मार्टफोन 4 जुलै रोजी लाँच होणार आहे. 


महत्त्वाच्या बातम्या : 


YouTube वरुन पैसे कमावणं झालं सोपं; आता 1000 नाहीतर तर फक्त इतकेच हवे सबस्क्राइबर्स