आता 'या' देशातही प्रवासादरम्यान 'सॅमसंग गॅलेक्सी नोट 7'वर बंदी
अमेरिकन परिवहन विभागाने शुक्रवारीच विमानांमधून गॅलेक्सी नोट-7 घेऊन प्रवास करण्याबर बंदी घातली होती. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई, तसेच हॅण्डसेट जप्त करण्याच्याही सुचना अमेरिकन परिवहन विभागाने सर्व एअरलाईन्सला दिल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबॅटरीमधील स्फोटांच्या घटनांमुळे सॅमसंगने आपले गॅलेक्सी सीरीजमधील नोट-7 स्मार्टफोन बाजारातून परत मागवले होते.फोनमधील स्फोटांच्या घटनांमुळे अनेकजण जखमी झाले होते. याशिवाय कंपनीने प्रमुख स्मार्टफोन हॅडसेटचे उत्पादन थांबवलं होतं.
यानंतर विमान प्राधिकरणाने शनिवारी सर्व एअरलाईन्सना सॅमसंग गॅलेक्सी नोट-7 घेऊन प्रवास करण्यावर तत्काळ बंदी घालण्याच्या सुचना दिल्या.
जपानच्या परिवहन मंत्रालयाने गेल्या आठवड्यात यासंबंधीचे आदेश दिले. यापूर्वी विमान प्रवाशांना विमानात स्मार्टफोन चार्ज करण्यावर बंदी घातली होती.
जपानने आपल्या देशातील सर्व एअरलाईन्सना विमानांमधून सॅमसंगचा गॅलेक्सी नोट-7 घेऊन प्रवास करण्यावर बंदी घातली आहे. अमेरिकासहित इतर देशांनी सॅमसंग गॅलेक्सीसोबत प्रवास करण्यावरुन बंदी घातल्यानंतर जपाननेही असा निर्णय घेतल्याने सॅमसंग गॅलेक्सी नोट-7 यूजर्सची मोठी पंचाईत झाली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -