HP Pavilion Aero 13 Price: HP ने आज आपला पोर्टेबल लॅपटॉप Pavilion Aero 13 बाजारात लॉन्च केला आहे. लॅपटॉपचे वजन फक्त 970 ग्रॅम आहे. ज्यामुळे हा बाजारातील सर्वात हलका लॅपटॉप आहे. हा लॅपटॉप तुम्ही पेल रोझ गोल्ड, वार्म गोल्ड आणि नॅचरल सिल्व्हर या तीन रंगांमध्ये खरेदी करू शकता. यामध्ये तुम्हाला 16:10 आस्पेक्ट रेशोसह 13-इंचाचा डिस्प्ले मिळेल, तसेच तो AMD प्रोसेसरसह लेस केलेला आहे.


किती आहे किंमत?


तुम्ही HP च्या अधिकृत वेबसाइट आणि ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart आणि Amazon द्वारे HP Pavilion Aero 13 लॅपटॉप खरेदी करू शकता. लॅपटॉपच्या बेस मॉडेलची किंमत 72,999 रुपये आहे. तर टॉप एंड व्हेरिएंटची किंमत 82,999 रुपये आहे. बेस व्हेरिएंट AMD Ryzen 5 CPU सह येतो. तर टॉप एंड व्हेरिएंट Ryzen 7 आणि 1TB SSD सह येतो.


स्पेसिफिकेशन 


HP Pavilion Aero 13 2023 मध्ये ग्राहकांना 13 इंच 2.5K डिस्प्ले मिळतो, जो 400 nits ब्राइटनेससह येतो. हा लॅपटॉप AMD Ryzen प्रोसेसरसह येतो. याशिवाय ग्राहकांना लॅपटॉपमध्ये यूएसबी ए पोर्ट, 3.5 मिमी हेडफोन जॅक आणि फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल. लॅपटॉपचा कीबोर्ड बॅकलाइट सपोर्टसह येतो. हा लॅपटॉप एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 10.5 तास वापरता येईल, असा दावा कंपनीने केला आहे. HP Pavilion Aero 13 फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. विशेष बाब म्हणजे कंपनीने या लॅपटॉपची बॉडी प्लास्टिक आणि वॉटर बेस्ड पेंटने तयार केली आहे.


Acer Aspire 3 लॅपटॉप 


Acer ने आपला नवीन लॅपटॉप Acer Aspire 3 भारतात जानेवारी महिन्यात लॉन्च केला होता. हा कंपनीचा पहिला लॅपटॉप आहे, जो Ryzen 5 7000 सीरीज प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. याची बॉडी देखील खास आहे. कारण यात मेटलचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय मोठ्या स्क्रीनसह लॅपटॉपमध्ये 40Wh बॅटरी देण्यात आली आहे. लॅपटॉप विंडोज 11 वर काम करतो. याची किंमत 50 हजारांच्या आत आहे. कंपनीने आपल्या या लॅपटॉपमध्ये अनेक आधुनिक फीचर्स दिले आहेत. हा लॅपटॉप दिसायला स्टायलिश असून याची क्वालिटी देखील मजबूत आहे. याचे वजन फक्त 1.6 किलो इतके आहे. हा 18.9 मिमी जाड आहे आणि लॅपटॉपमध्ये 15.6-इंचाचा FHD डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचे रिझोल्यूशन 1920 x 1080 पिक्सेल आहे. यासोबतच लॅपटॉपची स्क्रीन ब्लूलाइटशील्ड तंत्रज्ञानाला सपोर्ट करते. यात थर्मल मॅनेजमेंट सिस्टम देखील आहे. लॅपटॉपमध्ये (Acer Aspire 3 ) चांगल्या परफॉर्मन्ससाठी AMD Radeon ग्राफिक कार्ड, AMD Ryzen 5 7520U क्वाड-कोर प्रोसेसर, 8GB LPDDR5 रॅम आणि 512GB पर्यंत SSD स्टोरेज देण्यात आले आहे. कनेक्टिव्हिटीसाठी लॅपटॉपमध्ये (Acer Aspire 3 ) ब्लूटूथ 5.1, WIFI 6E आणि HDMI 2.1 पोर्ट सारखी फीचर्स आहेत. इतकेच नाही तर या लॅपटॉपमध्ये 40Wh ची पॉवरफुल बॅटरी आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंगसाठी वेबकॅम आहे.