New SIM Card Rules : 1 डिसेंबर 2023 पासून सिमकार्डसंदर्भातील (New SIM Card Rules ) नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहेत. हे सर्व बदल दोन महिन्यांपूर्वी लागू होणार असले तरी सरकारने त्यांची अंमलबजावणी करण्याची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवली होती. त्यामुळे आता 1 डिसेंबर 2023 पासून सिम खरेदी करण्यासाठी तुम्हाला नवीन नियमांचे पालन करावं लागणार आहे. नवे नियम लागू झाल्यानंतर देशातील सायबर फसवणुकीच्या घटना कमी होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी सरकारने हे नियम जारी केले आहेत. याचा परिणाम बल्क सिमकार्ड खरेदी आणि नवीन सिमकार्ड मिळण्यावरही होणार आहे. जाणून घेऊयात कोणते नवे बदल होत आहेत. 


सायबर फसवणूकींपासून सुटका होणार?


नवीन सिमकार्ड खरेदी करण्यासाठी ग्राहकांना आता पूर्वीपेक्षा अधिक तपशील द्यावा लागणार आहे. याच्या मदतीने अधिकारी सिमकार्डशी संबंधित व्यक्तीचा सहज पणे मागोवा घेऊ शकणार आहेत. याचा फायदा सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये होणार आहे. सध्या सायबर फ्रॉड आणि घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळए सिम कार्ड संदर्भात नवे नियम लागू करण्यात आले आहेत. कारण सायबर फसवणुकीच्या बहुतांश घटनांमध्ये बनावट नावाने खरेदी केलेले सिमकार्ड वापरले जाते. अशापरिस्थितीत नवे नियम लागू झाल्यानंतर दुसऱ्याच्या नावाचे सिम खरेदी करणे अवघड होणार आहे.


सिमकार्ड बदलले तर काय होईल?


जर तुम्ही तुमच्या सध्याच्या नंबरसाठी सिमकार्ड खरेदी करत असाल तर तुम्हाला तुमचे आधार कार्ड आणि डेमोग्राफिक डेटा दोन्ही द्यावे लागतील. इतकंच नाही तर ज्या व्यक्तीकडून तुम्ही सिम खरेदी कराल त्यालाही व्हेरिफिकेशन प्रक्रियेतून जावं लागणार आहे. त्यासोबतच डीलरचीही पडताळणी केली जाणार आहे. सरकारने सिमकार्ड विक्रेत्यांसाठी पडताळणी बंधनकारक केली आहे. म्हणजेच सिमकार्ड देताना सिम खरेदीदाराची कागदपत्रे आवश्यक असतील.


10 लाखांचा दंड


नियमांचे पालन न केल्याचे आढळल्यास सरकार 10 लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावू शकते. बल्क सिमकार्ड देण्यासंदर्भातील नव्या नियमांमध्येही बदल करण्यात आले आहेत. बल्क सिमकार्ड खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे बिझनेस कनेक्शन असणं गरजेचं आहे. 90 दिवसांनंतरच दुसऱ्या कुणाला सिम दिलं जाणार आहे. युजर आपल्या आयडीवर जास्तीत जास्त 9 सिमकार्ड खरेदी करू शकतो. जर तुम्ही सिमकार्ड डिअॅक्टिव्हेट केले तर तो नंबर 90 दिवसांनंतरच दुसऱ्या व्यक्तीला दिला जाईल.


इतर महत्वाच्या बातम्या : 


Hide locked chats : तुमचे सिक्रेट चॅट आता सिक्रेटच राहणार, पासवर्ड टाका नाही तर काहीही करा, whatsapp सिक्रेट चॅट उघडणार नाहीच!