Energizer Hard Case P28K Smartphone : स्पेन शहरातील बार्सिलोना येथे नुकताच सर्वात मोठा टेक इव्हेंट पार पडला. या टेक इव्हेंटमध्ये स्पॅनिश शहरातील एका कंपनीने सर्वात मोठी बॅटरी असलेला स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनमध्ये कंपनीने 5 किंवा 6 हजारांची नाही तर तब्बल 28,000mAh ची बॅटरी दिली आहे. या स्मार्टफोनच्या बॅटरी पॉवरबद्दल जाणून घेतल्यावर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल. तर, तुमच्या माहितीसाठी हा फक्त पॉवर बँकेच्या रूपात एक स्मार्टफोन आहे.
सर्वात मोठी बॅटरी असलेला स्मार्टफोन
या कार्यक्रमात जगभरातील कंपन्या आपल्या नाविन्यपूर्ण टेक्नॉलॉजीसह नवीन प्रोडक्ट्स बाजारात आणतायत. या क्रमाने, एनर्जीझर ब्रँडची मालकी असलेली कंपनी Avenir Telecom ने हा स्मार्टफोन सादर केला आहे. या स्मार्टफोनचे नाव Energizer Hard Case P28K आहे.
या स्मार्टफोनमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी बॅटरी आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये 28,000mAh ची बॅटरी दिली आहे. आजपर्यंत जगातील कोणत्याही स्मार्टफोनला एवढी मोठी बॅटरी देण्यात आलेली नाही. कंपनीचा दावा आहे की, जर तुम्ही हा स्मार्टफोन एकदा चार्ज केला तर पूर्ण आठवडा चार्ज करण्याची गरज भासणार नाही. कंपनीचे म्हणणे आहे की, सामान्य वापरातही स्मार्टफोन एका चार्जवर संपूर्ण आठवडा वापरता येतो.
कॅमेरा सेटअप देखील उत्तम
याशिवाय या स्मार्टफोनचे डिझाईनही खूप भारी आहे. Energizer Hard Case P28K मध्ये 6.78 इंच डिस्प्ले आहे, जो उत्कृष्ट पाहण्याचा अनुभव घेऊन येतो. कंपनीने या स्मार्टफोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. या सेटअपचा पहिला कॅमेरा 60MP, दुसरा कॅमेरा 20MP आणि दुसरा कॅमेरा 2MP कॅमेरा सेन्सरसह येतो.
याशिवाय सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी स्मार्टफोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 4G कनेक्टिव्हिटीसह येतो. कंपनीने या स्मार्टफोनबरोबर तीन वर्षांची वॉरंटी दिली आहे. Avenir टेलिकॉमचे मेन ऑफिस पॅरिसमध्ये आहे.
94 दिवसांचा स्टँडबाय वेळ
या स्मार्टफोनसाठी, कंपनीचा दावा आहे की तो एका चार्जवर 122 तासापर्यंत फोनवर बोलू शकतो. कंपनीचे म्हणणे आहे की सिंगल चार्जवर या स्मार्टफोनचा स्टँडबाय टाईम 2,254 तास म्हणजेच सुमारे 94 दिवस आहे. कंपनी हा स्मार्टफोन ऑक्टोबरमध्ये लॉन्च करणार आहे. तसेच, त्याची किंमत 250 युरो म्हणजेच जवळपास 22,000 रुपये असण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या :