मोटोरोलाने moto g85 5G च्या लाँचची घोषणा केली. मोटो जी सीरीजमधील हा पहिला स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये 3D कर्व्ह्ड, एंडलेस एज डिस्प्ले आहे. moto g85 5G या सेगमेंटमध्ये प्रथमच आणि सर्वोत्तम फीचर्स ऑफर आहेत, जसे की, या सेगमेंटमधील सर्वोत्तम 3D कर्व्ह्ड 120Hz pOLED डिस्प्ले, गोरिला ग्लास 5 प्रोटेक्शन आणि 1600 निट्सचा ब्राइटनेस. तसेच, या सेगमेंटमध्ये अग्रगण्य असलेला शेक फ्री 50MP OIS कॅमेरा, ज्यामध्ये अविश्वसनीय Sony LYTIA™ 600 सेन्सर आहे. हे डिव्हाइस स्लीक, हलके आणि सुपर-प्रीमियम डिझाइनसह, पँटोन क्यूरेटेड रंगांमध्ये उपलब्ध आहे आणि क्रांतिकारी स्मार्ट कनेक्टसह एक उत्कृष्ट सॉफ्टवेअर अनुभव प्रदान करते. यासोबतच, moto g85 5Gमध्ये सेगमेंटमधील सर्वोत्तम 12GB RAM + 256GB स्टोरेज आहे आणि 13 5G बँड्स, VoNR सपोर्टसह उत्कृष्ट 5G परफॉर्मन्सला सपोर्ट करते. हे डिव्हाइस फक्त रु. 16,999* (8+128GB) आणि रु. 18,999* (12+256GB) या प्रभावी किमतीत उपलब्ध आहे.
moto g85 5G या फोनमध्ये एक इमर्सिव्ह 6.7" pOLED एंडलेस एज डिस्प्ले आहे, ज्यामुळे एज टू एज अखंड व्ह्यू प्राप्त होतो आणि अनंत कॉन्ट्रास्ट आणि सिनेमॅटिक कलर अनुभवास येतो. डिस्प्लेमध्ये त्याच्या 10-बिट डेप्थ आणि DCI-P3 कलर गॅमटमुळे फिल्म-क्वालिटीच्या रंगांच्या एक अब्जपेक्षा जास्त छटा असतात आणि सेगमेंटमधील सर्वोत्तम गोरिला ग्लास 5 प्रोटेक्शन या फोनमध्ये आहे. त्यातील FHD+ रिझोल्यूशनमुळे पिक्सलेशन न करता अत्यंत शार्प आणि तपशीलवार प्रतिमा दिसते. शिवाय, सुपर-स्मूथ 120 Hz रिफ्रेश रेटमुळे अॅप्समध्ये स्विच करणे, गेम खेळणे, आणि वेबसाइट्स स्क्रोल करणे अधिक स्मूथ आणि सुरळीत होते. moto g85 5G चा डिस्प्ले SGS आय प्रोटेक्शन आणि 1600 निट्स पीक ब्राइटनेमुळे आरामदायक पाहण्याचा अनुभव आणि ऑन-डिस्प्ले फिंगरप्रिंट संरक्षणदेखील मिळते.
moto g85 5G मधील 50MP मुख्य कॅमेरा पॉवरफुल Sony LYTIA™ 600 सेन्सर आणि क्वाड पिक्सेल तंत्रज्ञानाचा वापर करतो, ज्यामुळे कमी प्रकाशात चौपट चांगली सेन्सिटिव्हिटी मिळते. परिणामी, प्रकाश कसाही असला तरी शार्प आणि अधिक व्हायब्रंट फोटो मिळतात. या शिवाय, ऑल-पिक्सेल फोकस कमी प्रकाशातील वातावरणात 32 पट जास्त फोकसिंग पिक्सेलसह जलद आणि अधिक अचूक परफॉरमन्स देतो आणि ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनमुळे (OIS) कॅमेरा अनावश्यक हलण्यामुळे धूसर होणाऱ्या प्रतिमा आणि व्हिडिओंचे आपोआप कॉम्पन्सेट करतो. सेकंडरी रियर कॅमेरा 8MP अल्ट्रावाइड + मॅक्रो व्हिजन कॅमेरा आहे, जो स्टँडर्ड लेन्सच्या तुलनेने फ्रेममध्ये 4 पट जास्त सामावून घेतो आणि मॅक्रो व्हिजन कॅमेरा वापरकर्त्यांना स्टँडर्ड लेन्सपेक्षा सब्जेक्टच्या जवळ आणतो, जेणेकरून त्यांना बारकावे कॅप्चर करता येऊ शकतात, जे इतर वेळी टिपले गेले नसते. पुढील बाजूस, वापरकर्त्यांना 32MP हाय रिझोल्यूशन सेल्फी कॅमेरा मिळतो, ज्यामध्ये क्वाड पिक्सेल तंत्रज्ञान आहे, जे कमी प्रकाशात चौपट चांगली सेन्सिबिलिटी आणि उत्कृष्ट परिणाम मिळविण्यासाठी प्रत्येक चार पिक्सेल्स एकात एकत्र करते.
गुगल फोटोजमध्ये सर्व फोटो आणि व्हिडिओ सेव्ह केले जातात, जे आपोआप बॅकअप केले जातात आणि नीट व्यवस्थापित केले जातात जेणेकरून त्यांना पाहणे, संपादित करणे आणि शेअर करणे सोपे होते. याशिवाय, ग्राहकांना अद्भुत एडिटिंग आणि AI साधनांचा वापर करता येतो, ज्यामध्ये मॅजिक एडिटर, मॅजिक इरेझर, फोटो अनब्लर इत्यादी सुविधा समाविष्ट आहेत.
किंमत आणि लाँच ऑफर:
लाँच किंमत:
8GB + 128GB: रु. 17,999
12GB + 256GB: रु. 19,999
प्रभावी किंमत – ऑफर्स समाविष्ट
8GB + 128GB: Rs. 16,999*
12GB + 256GB: Rs. 18,999*