Airtel Security Breach : आघाडीची टेलिकॉम कंपनी भारती एअरटेल (Airtel) च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. एअरटेल टेलिकॉम कंपनीच्या ग्राहकांची वैयक्तिक माहिती लीक झाली आहे. हॅकर्सने एअरटेल युजर्सचा पर्सनल डेटा चोरी (Data Leak) करत लीक केला आहे. एअरटेलच्या ग्राहकांचा डेटा डार्क वेबवर लीक (Dark Web Data Leak) झाल्याचं समोर आलं आहे. एअरटेलच्या ग्राहकांसाठी (BoAt Users) ही धोक्याची घंटा आहे. लीक झालेल्या माहितीमध्ये ग्राहकांची वैयक्तिक माहिती असल्याचं रिपोर्टमध्ये उघड झालं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सुमारे 37 कोटी एअरटेल ग्राहकांचा पर्सनल डेटा लीक (BoAt Users Data Leak) झाल्याचं बोललं जात आहे.
एअरटेल ग्राहकांसाठी मोठी बातमी
तुम्हीही एअरटेलचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फार चिंतेची आहे. एअरटेलवर सायबर हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. या सायबर हल्ल्याबाबत एअरटेल कंपनीने अद्याप कोणतेही अधिकृत माहिती दिलेली नाही. चीनी हॅकर्सनी एअरटेलच्या सर्व्हरवर सायबर हल्ला करत सुमारे 37 कोटी ग्राहकांचा डेटा लीक केला आहे. हॅकर्सच्या हाती लागलेल्या युजर्सच्या पर्सनल डेटामध्ये मोबाइल नंबर, आधार क्रमांक, ग्राहकांच्या घराचा पत्ता अशी अत्यंत संवेदनशील माहिती आहे.
37 कोटी ग्राहकांचा डेटा लीक
37 कोटी युजर्सची माहिती डार्क वेबवर लीक झाल्याचं बोललं जात आहे. एअरटेल इंडियाने डेटा लीकच्या दाव्यांना ठामपणे फेटाळले आहेत. मीडिया रिपोर्टच्या दाव्यानुसार, 375 दशलक्ष एअरटेल इंडिया युजर्सचा डेटा डार्क वेबवर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला होता. दरम्यान, एअरटेलच्या प्रतिष्ठेला कलंकित करण्याचा हा घातपाती प्रयत्न आहे. एयरटेलच्या सिस्टममधून कोणताही डेटा लीक झालेला नाही, असं एयरटेल इंडियाने म्हटलं आहे.
एअरटेल ग्राहकांसाठी धोक्याची घंटा
एका सोशल मीडिया युजरने ट्विटरवर यासंदर्भात पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये युजरने दावा केला आहे की, चीनी हॅकर्सनी एअरटेलच्या सर्व्हरमध्ये घुसून सुमारे 37 कोटी युजर्सचा डेटा चोरी केला आहे. हॅकर्सच्या हाती लागलेल्या डेटामध्ये ग्राहकांचा मोबाइल नंबर, आधार क्रमांक, एअरटेल ग्राहकांच्या घराचा पत्ता अशा प्रकारची माहिती समाविष्ट आहे.
डेटा लीकचा स्क्रीनशॉटही समोर
मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, हा डेटा डार्क वेबवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. एअरटेलच्या प्रवक्त्याने अमर उजालाला सांगितले की, हा खोटा अहवाल आहे. सर्व्हरवर कोणताही सायबर हल्ला झालेला नाही किंवा कोणताही डेटा लीक झालेला नाही.