मायक्रोसॉफ्टच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी कपात!
या स्मार्टफोनमध्ये करण्यात आलेली कपात ही फक्त अमेरिका आणि कॅनडाच्या बाजारापुरता लागू आहे. लवकरच भारतातही याच्या किंमतीत घट होण्याची शक्यता आहे. भारतात हे स्मार्टफोन अनुक्रमे 43,699 आणि 49,399 रुपयांना लाँच करण्यात आलं होतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया दोन्ही स्मार्टफोनमध्ये 32 जीबी मेमरी देण्यात आलं आहे. तसंच 3 जीबी रॅम देण्यात आली आहे.
लुमिया 950 मध्ये 5.2 इंच डिस्प्ले आहे तर 950XL मध्ये 5.7 डिस्प्ले देण्यात आला आहे. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 21 मेगापिक्सल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे.
लुमिया 650 विंडोजमध्ये 16 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आलं आहे. यामध्ये 8 मेगापिक्सल रिअर ऑटोफोकस कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
लुमिया 650 विंडोज 10 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतं. 5 इंच डिस्प्ले असून याचं रेझ्युलेशन 720x1280 आहे. यामध्ये 1 जीबी रॅम आहे.
लुमिया 950XL स्मार्टफोन 649 डॉलरला (जवळजवळ 43,400 रु.) लाँच केला होता. आता याची किंमत 499 डॉलर (जवळजवळ 33,000 रु.) आहे.
मायक्रोसॉफ्टनं लुमिया 950 स्मार्टफोन 549 डॉलरला (जवळजवळ 36,700 रु.) लाँच केला होता. आता याची किंमत 399 डॉलर (जवळजवळ 26,700 रु.) आहे.
लुमिया 650 हा स्मार्टफोन कंपनीनं जवळजवळ 199 डॉलरला (जवळजवळ 13,300 रु.) लाँच केला होता. पण आता हा स्मार्टफोन 149 डॉलरला (जवळजवळ 10,000 रु.) उपलब्ध आहे.
मायक्रोसॉफ्टनं आपल्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी कपात करण्याची घोषणा केली आहे. लुमिया 950, लुमिया 950XL आणि लुमिया 650 या स्मार्टफोनच्या किंमतीत कपात करण्याचा निर्णय कंपनीनं घेतला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -