Job Searching AI : अॅप संशोधक निमा ओवजी यांच्या मते, LinkedIn लवकरच वापरकर्त्यांना नोकऱ्यांसाठी अर्ज करण्यास आणि संपूर्ण प्रक्रिया सोपी करण्यात मदत करेल. अहवालानुसार, एआय कोच नावाचे फिचर वापरकर्त्यांना नोकरीसाठी अर्ज करण्यास, कौशल्य वाढविण्यात आणि त्यांच्या नेटवर्कशी कनेक्ट होण्याचे मार्ग शोधण्यात मदत करेल.  एआय तुम्हाला नोकरी शोधण्यात कशी मदत करेल आणि ते तुमच्यासाठी कसे फायदेशीर ठरेल ते जाणून घ्या.


AI बर्याच काळापासून आहे. परंतु ओपनएआयच्या चॅटजीपीटीच्या लोकप्रियतेमुळे, तंत्रज्ञानामध्ये मोठी प्रगती झाली आहे. AI चॅटबॉट नोव्हेंबर 2022 मध्ये लोकांना माहित करून देण्यात आला आणि माणसांप्रमाणे तो प्रतिसाद देतो हे पाहून लोकांना धक्का बसला. कथा लिहिणे असो, कविता आणि गाणी लिहिणे असो किंवा चांगल्या कंन्टेंटकरता कल्पना मांडणे असो, ChatGPT लवकरच लोकांच्या  गरजांसाठी एक चांगले सोल्यूशन बनले. चॅटजीपीटीच्या लोकप्रियतेनंतर मायक्रोसॉफ्ट आणि गुगलनेही त्यांचे स्वतःचे चॅटबॉट्स, बिंग आणि बार्ड लॉन्च केले आहेत.


LinkedIn वर जॉब ऍप्लिकेशन्ससाठी AI करेल मदत


या वर्षी मे मध्ये, अशी नोंद करण्यात आली होती की LinkedIn एका नवीन वैशिष्ट्याची चाचणी करत आहे. ज्यामध्ये ते त्यांच्या वापरकर्त्यांना त्यांच्यासाठी योग्य असलेल्या जॉब अॅप्लिकेशन्स तयार करण्यात मदत करण्यासाठी AI चा वापर करेल. अहवालानुसार, LinkedIn एका वैशिष्ट्याची चाचणी करत आहे जे नोकरी शोधणाऱ्यांना कसे लिहायला हवे हे सांगण्यात मदत करेल आणि  ते हायरिंग मॅनेजरला पाठवू शकतात. त्यामुळे नोकरी मिळण्याची शक्यता वाढू शकतात. वापरकर्ते कव्हर लेटरसारखे संदेश तयार करू शकतील जे लहान आणि टू-द-पॉइंट असतील.






तसेच  लिंक्डइनने जॉब पोस्टसाठी व्हेरिफिकेशनची सेवा काही दिवसांपूर्वी सुरु केली होती. त्यामुळे  जे लोक लिंक्डइनवर नोकरीच्या शोधात होते ते  कोणत्याही कंपनीबद्दल व्हेरिफाईड माहिती जाणून घेऊ शकतात. त्यामुळे फसवणुकीचे प्रकार देखील कमी होण्यास मदत झाली. भारत लिंक्डइनच्या उद्योगासाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. लिंक्डइन युजर्समध्ये अमेरिकेनंतर भारताचा दुसरा क्रमांक लागत असून यामध्ये सुमारे 80 कोटी युजर्स आहेत. गेल्या तीन वर्षात भारतीय लिंक्डइन युजर्समध्ये च्या सदस्य संख्येमध्ये दरवर्षी सुमारे 2 कोटी युजर्सची वाढ झाली आहे. कोरोना महामारीच्या काळानंतर लिंक्डइनवर लोकांचा सहभाग आणि परस्पर संवादात वाढ झाली आहे. 


 


इतर महत्वाच्या बातम्या


Airports in India : सावधान! विमानाने प्रवास करताना पाॅवर बँक घेऊन जाणे पडेल महागात, होऊ शकते जप्तीची कारवाई