Google New Feature : गुगल सर्चमध्ये आता व्याकरण तपासण्याची सुविधा; सध्या फक्त 'याच' भाषेत उपलब्ध

Google Search Grammar check feature : Google Search प्लॅटफॉर्मवर यूजर्ससाठी एक नवीन व्याकरण तपासणारं फीचर अॅड केलं आहे.

Continues below advertisement

Google Search Grammar check feature : टेक्नॉलॉजी कंपनी Google ने आपल्या Google Search प्लॅटफॉर्मवर यूजर्ससाठी एक नवीन व्याकरण तपासणारं फीचर (Grammar Check Feature) अॅड केलं आहे. कंपनीने नुकतंच सुरु केलेलं हे फीचर सध्या इंग्रजी भाषेसाठी आहे. मात्र, येणाऱ्या काळात आणखी भाषांसाठी हे फिचर वापरलं जाऊ शकतं.  9To5Google च्या अहवालानुसार, कंपनीचे म्हणणे आहे की, या फिचरमुळे वाक्य व्याकरणदृष्ट्या योग्य आहे की नाही आणि ते कसे योग्य पद्धतीने लिहायचे हे सांगण्यात येईल.

Continues below advertisement

'असे' वापरू शकता

अहवालानुसार, हे फीचर (Google Search Grammar check) वापरण्यासाठी यूजर्सना फक्त ग्रामर चेक, चेक ग्रामर किंवा ग्रामर चेकरसह एक वाक्य अॅड करणं गरजेचं आहे. जर तुम्ही टाईप केलेल्या वाक्याचं व्याकरण योग्य असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हिरवा चेकमार्क दिसेल. आणि तुमची वाक्यरचना जर चुकीची असेल तर त्यामध्ये सुधारणा केली जाईल.    या टूलचा वापर करून शुद्धलेखनाच्या चुकाही सुधारल्या जातील.

अजून 100 टक्के अचूक नाही 

IANS च्या बातमीनुसार, जेव्हा यूजर्स सुधारित आवृत्तीच्या जवळ असतील तेव्हा एक कॉपी बटण दिसेल. असे असले तरीही ही प्रक्रिया 100 टक्के अचूक असू शकत नाही असं  Google कडून सांगण्यात आलं आहे. यूजर्सला काही अडचण आल्यास ते फीडबॅकही देऊ शकतात. 

एक सपोर्ट पेज झालेला लाईव्ह

बातमीनुसार, या फीचरसाठी एक सपोर्ट पेज (Google Search Grammar check) पहिल्यांदा गेल्या महिन्याच्या शेवटी लाइव्ह झाले. गेल्या आठवड्यात, Google ने यूजर्सना त्यांची वैयक्तिक माहिती, सिक्युरिटी आणि ऑनलाईन सुरक्षिततेवर नियंत्रण ठेवण्यास मदत करण्यासाठी सर्चमध्ये नवीन वैशिष्ट्यांची घोषणा केली. 

महत्त्वाच्या बातम्या :

Instagram Threads Update : इंस्टाग्राम थ्रेड्समध्ये Search Option असेल, डेस्कटॉपवर देखील वापरता येईल; लवकरच येणार नवं फिचर

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola