तुम्ही अजूनही जिओ प्राईम मेंबरशीप घेऊ शकता!
प्राईम युझर्सने 99 रुपयांचा रिचार्ज केल्यास 84 दिवसांसाठी 84 GB डेटा मिळेल. तर नॉन प्राईम मेंबर्सना 28 दिवसांसाठी 28 GB डेटा मिळेल.
जिओ प्राईम मेंबर्सना 99 रुपयांचं रिचार्ज करावं लागेल. ज्यामध्ये सामान्य प्लॅनपेक्षा जास्त फायदे मिळतील.
दरम्यान जिओकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. अशी काही ऑफर चालू असल्याची अधिकृत घोषणाही जिओने अजून केलेली नाही.
99 रुपयांचा रिचार्ज केल्यास प्राईम मेंबरशीप मिळेल. ज्याची व्हॅलिडिटी एप्रिल 2017 ते मार्च 2018 असेल. पोस्टपेड आणि प्रीपेड ग्राहकांनाही 99 रुपयांचा रिचार्ज करता येईल.
Zeebiz च्या वृत्तानुसार रिलायन्स जिओच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. ज्या ग्राहकांना आतापर्यंत प्राईम मेंबरशीप घेता आली नाही, ते ग्राहक आता 99 रुपयांमध्ये जिओचे प्राईम मेंबर होऊ शकतात.
रिलायन्स जिओने प्राईम मेंबरशीप ऑफरची अखेरची तारीख 15 एप्रिल 2017 ठेवली होती. मात्र जिओ युझर्स अजूनही प्राईम मेंबरशीप घेऊ शकतात, अशी माहिती आहे.