Cheapest 5G Phone in India: तुम्ही अगदी स्वस्तात 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आता शक्य होणार आहे. कारण आता भारतातील सर्वात स्वस्त 5G फोन लॉन्च झाला आहे. 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत हा  5G फोन खरेदी करता येणार आहे.  Itel या कंपनीनं भारतात आपला नवीन 5G फोन लॉन्च केला आहे. ज्याची किंमत एकूण तुम्ही थक्क व्हालं. 


बाजारात नवनवीन फोन आले आहेत. चांगले फिचर्स असणारे अगदी कमी किंमतीत म्हणजेच 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत तुम्ही नवीन फोन खरेदी करू शकता. Itel ने भारतात आपला नवीन 5G फोन लॉन्च केला आहे, ज्याची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. या फोनचे सविस्तर तपशील जाणून घेऊयात.


Itel ने दोन नवीन 5G फोन केले लॉन्च


Itel ने दोन नवीन 5G फोन लॉन्च केले आहेत. Itel P55 5G हा कंपनीचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन भारतात उपलब्ध आहे. यात MediaTek Dimensity चिपसेट आणि HD+ डिस्प्ले आहे. यासोबतच कंपनीने Itel S23+ 5G लॉन्च केला आहे, ज्याची किंमत 15 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. कंपनीने या फोनमध्ये 3D वक्र डिस्प्ले दिला आहे. कंपनीने 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत Itel P55 5G लाँच केला आहे. कंपनीनं या फोनला दोन वर्षांची वॉरंटी देखील दिली आहे.


चला जाणून घेऊया या स्मार्टफोन्सची किंमत 


Itel कंपनीने 9,999 रुपयांच्या किमतीत Itel P55 5G लाँच केला आहे. ही किंमत फोनच्या 6GB रॅम + 128GB स्टोरेज वेरिएंटसाठी आहे. तर 4GB RAM + 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 9,699 रुपयाला मिळणार आहे. हा हँडसेट तुम्ही Amazon वरुन खरेदी करु शकाल. हा फोन हिरव्या आणि निळ्या रंगात उपलब्ध आहे. या फोनची विक्री चार ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.


Itel S23+


Itel या स्मार्टफोनला दोन वर्षांची वॉरंटी आहे. VIP स्क्रीन रिप्लेसमेंट ऑफरसह येतो. तर कंपनीने Itel S23+ फक्त एकाच कॉन्फिगरेशनमध्ये लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 13,999 रुपये आहे. जी 8GB रॅम + 256GB स्टोरेज वेरिएंट आहे. तुम्ही ते दोन रंगांच्या पर्यायांमध्ये देखील खरेदी करू शकता.


या नवीन फोनची वैशिष्ट्ये काय आहेत? 


Itel P55 मध्ये 6.6-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे, जो 90Hz रिफ्रेश रेटसह येतो. यात MediaTek Dimensity 6080 प्रोसेसर आहे. स्मार्टफोन 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेजसह येतो. या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्याची मुख्य लेन्स 50MP आहे. यात 5000mAh बॅटरी आहे. सुरक्षेसाठी कंपनीने साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. यामध्ये तुम्हाला 5G कनेक्टिव्हिटी, ड्युअल बँड वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट देण्यात आला आहे.


Itel S23+ ची वैशिष्ट्ये


Itel S23+ 5G मध्ये 6.78-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले आहे. स्क्रीनच्या संरक्षणासाठी गोरिल्ला ग्लास 5 देण्यात आला आहे. हे उपकरण Unisoc Tiger T616 प्रोसेसरवर काम करते. यात 8GB रॅम + 256GB पर्यंत स्टोरेज आहे. फोन ड्युअल रियर कॅमेरा सेटअप सह येतो. त्याची मुख्य लेन्स 50MP आहे. कंपनीने फ्रंटमध्ये 32MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. हा फोन Android 13 वर काम करतो. यात आयफोन 15 प्रमाणे डायनॅमिक बार फीचर आहे. यात 5000mAh बॅटरी आणि 18W चार्जिंग आहे. सुरक्षेसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


iPhone Radiation : फ्रान्समध्ये आयफोन 12 विक्रीवर बंदी, रेडिएशन पसरवत असल्याचा आरोप; नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या...