मुंबई : iPhone 15 खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आयफोन प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी असून त्याच्यावर जवळपास 9,000 रुपयांची सवलत तुम्हाला मिळू शकते. ई-कॉमर्स साइट क्रोमावर ही ऑफर सुरू आहे. त्याचसोबत तुम्ही तुमचा जुना आयफोन एक्सचेंज करून iPhone 15 अगदी कमी किमतीत खरेदी करू शकता.
Apple दरवर्षी नवीन iPhone आणत असते. गेल्या वर्षी कंपनीने iPhone 15 सीरीज लॉन्च केली होती. या वर्षी कंपनी बाजारात आयफोन 16 सीरीज लॉन्च करणार आहे. यामध्ये अनेक एआय फीचर्स असतील अशी माहिती आहे. पण त्याच्या आधी iPhone 15 च्या किमती कमी झाल्या आहेत.
iPhone 15 Discount : आयफोन खरेदीवर मोठी सवलत
ई-कॉमर्स साइट क्रोमाकडून 71, 290 रुपयांना आयफोन 15 खरेदी करण्याची संधी आहे. त्याची मूळ किंमत 79,900 रुपये आहे. अशा परिस्थितीत हा स्मार्टफोन 8,610 रुपयांनी स्वस्त उपलब्ध आहे. यावर 10.78 टक्क्यांची संपूर्ण सूट उपलब्ध आहे.
जर तुमच्याकडे आयफोन 13 किंवा 14 असेल आणि तुम्हाला आयफोन 15 घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी एक्सचेंज ऑफर सर्वोत्तम पर्याय आहे. समजा तुमच्याकडे iPhone 14, 128GB मॉडेल आहे, तर त्याचे Croma वर एक्सचेंज व्हॅल्यू 26,610 रुपये आहे. ही एक्सचेंज व्हॅल्यू फोनच्या स्थितीवर आधारित असेल. फोनची स्क्रीन, कॅमेरा, डेंट्स, क्रॅक इत्यादी गोष्टी योग्य असतील तर तुमच्यासाठी ही ऑफर चांगली आहे.
iPhone 15 Series Features : आयफोन 15 वैशिष्ट्ये
iPhone 15 च्या डिस्प्लेबद्दल बोलायचे झाले तर, यात 6.1 इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. डिस्प्लेमध्ये डायनॅमिक आयलंड फीचर उपलब्ध आहे. स्टोरेजमध्ये, iPhone 15 मध्ये 128GB, 256GB आणि 512GB स्टोरेजचा पर्याय आहे. (iPhone 15 specifications) प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर, iPhone 15 मध्ये A16 Bionic चिप आहे, ज्यामध्ये अनेक प्रगत वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.
Apple iPhone 15 Series मध्ये 48MP प्राथमिक कॅमेरा आहे. फोनवरून 24MP आणि 48MP चे सुपर हाय रिझोल्युशन फोटो क्लिक केले जाऊ शकतात. बेसिक मॉडेलमध्ये 4x ऑप्टिकल झूम रेंज उपलब्ध असेल. प्रो मॉडेलमध्ये कंपनीने 10x पर्यंत ऑप्टिकल झूम रेंजची सुविधा सादर केली आहे.
ही बातमी वाचा: