अॅपल कंपनीकडून दरवर्षी नवनवे आयफोन लाँच केले जातात.गेल्या वर्षी कंपनीनं iPhone 15 Series लाँच केली होती. यावर्षी कंपनीकडून iPhone 16 लाँच केला जाणार आहे. त्यामध्ये मल्टीपल एआय फीचर्स देखील असणार आहेत. मात्र,आयफोन 16 लाँच होण्यास अजून वेळ आहे. त्यापूर्वीच आयफोन 15 च्या किमतीमध्ये घट झाली आहे. ही आयफोन प्रेंमीसाठी आनंदाची बातमी आहे. जर तुम्हाला आयफोन 15 खरेदी करायचा असेल तर तुम्ही कमी दरात खरेदी करु शकता. तुम्हाला आयफोनवर 9 हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. विविध बँक ऑफर्सचा लाभ घेत या डिस्काऊंटचा लाभ घेता येऊ शकतो.
तुम्हाला आयफोन 15 खरेदी करायचा असल्यास तुम्हाला ई कॉमर्स वेबसाईट क्रोमावर तुम्हाला सवलतीच्या दरात आयफोन मिळू शकतो. क्रोमामध्ये तुम्हाला आयफोन 15 हा मोबाईल 71 हजार 290 रुपयांना मिळतोय. याची मूळ किंमत 79900 रुपये आहे. म्हणजेच हा आयफोन तुम्हाला 8610 रुपयांनी कमी किमतीत मिळत आहे. एकूण 10.78 टक्के सूट क्रोमावरुन आयफोन खरेदी केल्यास मिळू शकते.
एक्सचेंज केल्यास अर्ध्या किमतीत आयफोन
जर तुम्ही पहिल्यापासून आयफोन वापरत असाल तर तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा लाभ घेता येईल. समजा तुमच्याकडे आयफोन 14 , 128 GB या मॉडेलचा फोन असेल तर तुम्हाला क्रोमावर एक्स्चेंज मूल्य 26 हजार 610 रुपये मिळेल. ही रक्कम तुमच्याकडे असलेला फोन कोणत्या स्थितीत आहे, यावर असेल. फोन डॅमेज झालेला नसला पाहिजे. त्याची स्क्रीन, कॅमेरा, डेंट, क्रॅक्स सह इतर गोष्टींचा देखील एक्सचेंज करताना विचार केला जाईल.
आयफोन 15 चा डिस्प्ले 6.1 इंच असून त्याला Super Retina XDR डिस्प्ले देण्यात आलेला आहे. यामध्ये Dynamic Island फीचर मिळतं. आयफोन 15 मध्ये 128 GB, 256 GB, 512 GB स्टोरेजचा ऑप्शन मिळतो. आयफोन 15 चा प्रोसेसर A16 Bionic चिप असलेला आहे. याशिवाय काही अद्ययावत फीचर्स देखील आहेत.
Apple आयफोन 15 मध्ये 48 मेगा पिक्सलचा कॅमेरा मिळतो. या फोनवरुन 24 मेगा पिक्सल ते 48 मेगापिक्सल सुपर हाय रिझॉल्युशनचे फोटो काढता येतात. बेसिक मॉडेलमध्ये 4x ऑप्टिकल झुम रेंज मिळणार आहे. प्रो मॉडेलमध्ये ही रेंज 10x पर्यंत असेल.
इतर बातम्या :