मुंबई : अलिकडच्या काळात सोशल मीडियाचा वापर कमालीचा वाढला आहे. इंटरनेट आणि सोशल मीडियावर आपण जवळजवळ पूर्णपणे अवलंबून आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. इंटरनेटच्या प्रगतीमुळे सोशल मीडियाचा वापर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. इंस्टेंट मेसेजिंग ॲपमुळे तर अनेक जण स्वत:ची लाईफ सोशल करण्यासाठी आसुसलेले पाहायला मिळतात. सोशल मीडियावर पोस्ट आणि स्टोरी शेअर करणं अनेकांच्या जीवनाचा जणू एक अविभाज्य भागच बनला आहे.


मृत्यूनंतर सोशल मीडिया अकाऊंटचं काय होतं?


सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स अनेक आहेत, पण जगभरात वापरता येतील असे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स खूप कमी आहेत. जगभरात वापरता येणाऱ्या सोशल मीडिया ॲप्समध्ये मेटा कंपनीच्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप यांचा समावेश होतो. या ॲप्समुळे जगभरातील लोक एकमेकांशी सहज जोडले गेले आहेत. इंटरनेटमुळे मानवाचं आयुष्य सोपं झालं आहे, तुम्ही एका क्लिकवर कोणतीही माहिती सहज शोधू शकता.


मृत्यूनंतरही सुरु ठेवता येतं सोशल मीडिया अकाऊंट


सोशल मीडिया स्वत:चे मनोरंजन करण्याचं एक साधन असून जगाशी जोडलं जाणारं एक व्यासपीठही आहे. जगभरातील सुमारे 200 कोटीहून अधिक लोक सोशल मीडिया ॲप्सचा वापर करतात. अनेलोक लोक दिवसभर सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतात. पण, तुम्ही कधी विचार केला आहे की, मृत्यूनंतर तुमच्या सोशल मीडियावरील म्हणजेच इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सॲप अकाऊंटचं काय होईल? याबद्दल आज जाणून घ्याय


मृत्यूनंतरही सोशल मीडिया अकाऊंट चालवता येतं


मृत्यूनंतरही तुमचं सोशल मीडिया अकाऊंट सुरु ठेवता येतं, यासाठी तुम्हाला तुमच्या सोशल मीडिया अकाऊंटचा वारस शोधावा लागेल. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर तुम्हाला तुमच्या अकाऊंटचा वारस निवडण्याची सुविधा मिळते. यामुळे मृत्यूनंतरही दुसरी व्यक्ती तुमचं अकाऊंट चालवू शकते.


सोशल मीडिया अकाऊंटचा वारस कसा निवडावा?



  • फेसबुकमध्ये युजरला दोन प्रकारच्या सुविधा मिळते. पहिली म्हणजे तुमची इच्छा असेल तर मृत्यूनंतर तुम्ही तुमचं अकाऊंट हटवू शकता आणि दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही अकाऊंट तुमच्या वारसांकडे हस्तांतरित करू शकता. लेगसी पर्याय निवडून तुम्ही तुमचं अकाऊंट सुरळीत चालू ठेवू शकता. 

  • फेसबुक अकाऊंटचा वारस निवडण्यासाठी, तुम्हाला तुमच्या Facebook खात्याच्या सेटिंग्ज आणि प्रायव्हसीमध्ये जावं लागेल.

  • सर्वात आधी फेसबुकच्या सेटिंग्ज ऑप्शनवर जा आणि तिथे Personal Account Information वर क्लिक करा.

  • आता तुम्हाला Account Ownership and Control चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा आणि Memorialisation निवडा.

  • येथे तुम्हाला दोन पर्याय दिसतील ज्यात पहिला आहे लेगसी कॉन्टॅक्ट आणि दुसरा 'डिलीट अकाउंट आफ्टर डेथ'

  • वारस निवडण्यासाठी, लेगसी कॉन्टॅक्टवर क्लिक करा आणि आता ज्या व्यक्तीला तुमचा वारस बनवायचा आहे ती निवडा. म्हणजे अशी व्यक्ती जी तुमच्या मृत्यूनंतर तुमचं अकाऊंट चालवेल.


तुम्ही लेगसी कॉन्टॅक्ट जोडलेली व्यक्ती तुमच्या अकाऊंटवर पोस्ट करणे किंवा पोस्ट हटवणे या गोष्टी करू शकते. ही व्यक्ती तुमचं अकाऊंट डिलीटही करु शकते. फेसबुकला अकाउंट डिलीट करण्यास सांगू शकतो. पण येथे सर्वात महत्वाचं म्हणजे लेगसी कॉन्टॅक्ट जोडलेली व्यक्ती आपल्या अकाऊंटवरून फक्त तेच मेसेज किंवा पोस्ट हटवू शकते जे त्याने तुमच्या मृत्यूनंतर पोस्ट केले आहेत. त्याआधीचे पोस्ट किंवा मेसेज त्या व्यक्तीला डिलीट करता येणार नाहीत.


लेगसी कॉन्टॅक्टला असलेली काही बंधने



  • तुमचे खाजगी मेसेज वाचू शकत नाही

  • फॉलोअर्स, टॅग, कमेंट, जुन्या पोस्ट किंवा फोटो हटवणे किंवा बदलणे हे करता येणार नाही.

  • जुन्या मित्रांना हटवणे किंवा नवीन फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारणे, हे करता येणार नाहीत.

  • लेगसी कॉन्टॅक्ट अकाऊंटसाठी दुसरा वारस निवडू शकत नाही.

  • Facebook प्रमाणे, Instagram वर देखील आपण खात्यासाठी वारस निवडू शकता. दोन्ही मेटा ॲप्स असल्याने याची पद्धत जवळजवळ सारखीच आहे.