iPhone 14 Plus Discount : जर तुम्ही होळीच्या (Holi 2024) मुहूर्तावर आयफोन (iPhone) खरेदी करण्याचा विचार करत असाल ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. Apple iPhone 14 Plus चे 128GB स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध आहे. हा आयपोन जर तुम्ही खरेदी करेला तर तुमच्या पैशांचीही बचत होऊ शकते. Apple iPhone 14 Plus हा 2022 मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. पण, होळीच्या मुहूर्तावर या आयफोनमध्ये भरघोस ऑफर देण्यात आली आहे. 


ॲपलचा हा आयफोन आता फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्यावर उपलब्ध असलेल्या ऑफर आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. 


iPhone 14 Plus वर मिळणारी ऑफर 


Apple चे iPhone 14 Plus मॉडेल फ्लिपकार्टवरून डिस्काउंटसह खरेदी केले जाऊ शकते. त्याची मूळ किंमत 79,900 रुपये आहे. पण होळीच्या निमित्ताने मिळणाऱ्या सवलतीमुळे त्याची किंमत 66,999 रुपयांपर्यंत खाली आली आहे. याशिवाय ग्राहकांना एक्सचेंज व्हॅल्यूचाही लाभ मिळू शकतो.


फ्लिपकार्ट 23,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट देत आहे. जर ग्राहकांनी एक्सचेंजसाठी iPhone 13 mini दिले तर त्याचे मूल्य वजा केल्यानंतर, iPhone 14 ची प्रभावी किंमत 44,297 रुपये राहते.


आयफोन 14 प्लस तपशील (iPhone 14 Plus Specification)


डिस्प्ले : यात 6.7 इंच लिक्विड रेटिना डिस्प्ले आहे. हे डायनॅमिक आयलंड रेंजमधील नॉच डिझाइनसह येते.


प्रोसेसर : iPhone 14 Plus मध्ये कार्यक्षमतेसाठी A15 बायोनिक चिपसेट आहे. यात 5 कोअर ऍपल GPU आहे.


कॅमेरा : 12MP मुख्य कॅमेरा आणि 12MP अल्ट्रावाइड लेन्स बॅक पॅनलवर प्रदान केला आहे. तर सेल्फीसाठी 12-मेगापिक्सलचा सेन्सरही उपलब्ध आहे.


OS : यूजर्सना सर्वोत्तम अनुभव देण्यासाठी, फोन पूर्व-इंस्टॉल केलेल्या iOS सह येतो.


रंग : हा फोन मिडनाईट, पर्पल, स्टारलाईट, निळा, लाल आणि पिवळ्या अशा कलरमध्ये ऑफर करण्यात आला आहे.


महत्त्वाच्या बातम्या :


Holi 2024 : होळीत रंगांची उधळण करताना iPhone पाण्यात गेला तर काय करावं आणि करू नये? 'या' खास टिप्स तुमच्यासाठी...