Holi 2024 : जर तुम्ही यंदाच्या होळीत (Holi 2024) खेळण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. होळीचा सण अवघ्या एका दिवसावर आहे. अशातच रंगांची उधळण करताना आपण इतके दंग होतो की आपल्या हातात मोबाईल (Mobile) आहे हे देखील आपण विसरून जातो. अशा वेळी होळी खेळताना जर चुकून तुमचा आयफोन (iPhone) ओला झाला तर काय करावं आणि काय करू नये? याची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. यासाठीच काही खास टिप्स तुमच्यासाठी... 


सर्वात आधी, Apple चे iPhone 7 आणि नंतरचे सगळे डिव्हाईस हे वॉटरप्रूफ आणि धूळ प्रतिरोधक आहेत. पण, असं असलं तरी तुमचा आयफोन पाण्यात भिजणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे. आता प्रश्न असा येतो की, होळी खेळताना जर आयफोन पाण्याने ओला झाला तर नेमकं काय करायचं? खरंतर, अॅपल कंपनी स्वत: आपल्या ग्राहकांना आयफोन ओला होण्याबाबत काही खास टिप्स देते. अशा वेळी जर तुमचा आयफोन ओला झाला तर लगेच या गोष्टी करा. 


आयफोन ओला झाल्यास काय करावं? 


1. तुमच्या iPhone वर पाण्याव्यतिरिक्त कोणतेही द्रव सांडल्यास, आयफोन ताबडतोब नळाच्या पाण्याने स्वच्छ करा.


2. फोन पाण्याने स्वच्छ केल्यानंतर, तो पुसण्यासाठी सॉफ्ट कापडाचा वापर करा. फोन स्वच्छ करण्यासाठी तुम्ही लेन्स कापड वापरू शकता.


3. जर तुम्ही सिम ट्रे उघडणार असाल तर आधी फोन पूर्णपणे कोरडा आहे का पाहा. 


4. फोन सुकविण्यासाठी तळहाताचा वापर केला जाऊ शकतो. मात्र, यासाठी USB C कनेक्टर फक्त खाली ठेवा.


5. जर फोन ओला झाला असेल तर तो काही वेळ वापरू नका आणि हवेशीर जागी सोडा.


6. तुम्ही पंख्याच्या हवेने फोन सुकवण्याचाही प्रयत्न करू शकता.


आयफोन ओला झाल्यास काय करू नये?


1. फोन सुकविण्यासाठी कोणत्याही गरम स्त्रोताचा वापर करू नका.  


2. तसेच, आयफोन सुकविण्यासाठी डिव्हाईसमध्ये कोणत्याही प्रकारचे काहीही घालू नका.


3. आयफोनच्या लाईटनिंग किंवा USB C कनेक्टरमध्ये कापूस किंवा पेपर टॉवेल घालण्याचा प्रयत्न करू नका.


4. जर आयफोन पाण्यात भिजला असेल तर, डिव्हाईस जोपर्यंत पूर्णपणे सुकत नाही तोपर्यंत चार्जिंगवर ठेवू नका. या टिप्स फॉलो करा. 


महत्त्वाच्या बातम्या :


Whatsapp : गुड न्यूज! आता एक नाही तर 3 मेसेज करा Pin; व्हॉट्सअपचं नवीन फीचर, 'या' यूजर्सना मिळणार लाभ