Apple Pay : आयफोन (iPhone) युजर्ससाठी चांगली बातमी आहे. ॲपल (Apple) कंपनी स्वत:चं वेगळं पेमेंट ॲप (Payment App) आणण्याच्या तयारीत आहे. यामुळे गुगल पे (Gpay), फोन पे (Phonepe) आणि Paytm ला टक्कर देण्यासाठी ॲपल कंपनी (Apple Company) नवीन सुविधा लाँच करणार आहे. यामुळे आयफोन युजर्सना आता पेमेंटसाठी दुसऱ्या ॲपवर अवलंबून राहावं लागणार नाही. ॲपल कंपनी दक्षिण आशियाई बाजारात ॲपल पेमेंट ॲप (Apple Payment App) लाँच करण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात सध्या विचारविनिमय सुरु आहे. यासंदर्भात ॲपल कंपनी लवकरच नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया (NPCI) सोबतही महत्त्वाची चर्चा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ॲपल कंपनी सध्या या पार्श्वभूमीवर योजना आखत आहेत.


ॲपल स्वत:चं वेगळं पेमेंट ॲप लाँच करणार


ॲपल कंपनी आता ऑनलाईन पेमेंटकडे वळण्याची तयारी करत आहे. त्यामुळे जीपे (GPay) आणि फोनपे (PhonePe) यांसारख्या पेमेंट ॲपला टक्कर मिळणार आहे. वॉलमार्ट (Walmart) कंपनीचा फोनपे, गूगल (Google) कंपनीचं गुगल पे (Google Pay) आणि (One97) पेटीएम (Paytm), ॲमेझॉन पे यांसारखे पेमेंट ॲप उपलब्ध आहेत. ॲपल कंपनी या क्षेत्रामध्ये उतरल्यास आयफोन युजर्सला ऑनलाईन पेमेंटसाठी वेगळ्या ॲपची गरज भासणार नाही. यामुळे त्याचं काम अधिक सोपं होईल.


ॲपल पेमेंट ॲपमध्ये असेल ही खास सुविधा


भारतीय अधिकार्‍यांशी बोलताना ॲपल (Apple) कंपनीने सांगितले की, ॲपल पेमेंट ॲपमध्ये एक खास सुविधा असेल. युजर्स पेमेंट ॲपमध्ये फेस-आयडेंजीफिकेशन (Face Identification) फिचर असेल. या फिचरमुळे युजर्सची गोपनीयता राखली जाईल आणि ते सुरक्षित व्यवहार करू शकतील.


Apple Pay ॲपवर अनेक वर्षांपासून काम सुरु


ॲपल कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून या पेमेंट ॲपवर काम करत आहे. ॲपल मागील 6 वर्षांपासून स्वतःच्या पेमेंट सेवेवर काम करत आहे. पण, याबाबत काही प्रगती आणि खास अपडेट समोर आलेली नाही. पण आता ॲपल कंपनीने भारतीय अधिकाऱ्यांसोबत केलेल्या चर्चेवरून असं दिसून येत आहे की, ॲपल कंपनी लवकरच स्वत:चा पेमेंट ॲप बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे कंपनी लवकरच भारतात Apple Pay लाँच करण्याची शक्यता आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


PM Modi US Visit : पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यामुळे भारताला फायदा, अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक, गुगल-ॲमेझॉनसारख्या मोठ्या कंपन्यांची घोषणा