ChatGPT News Update : चॅट जीपीटी सध्या जगभरात सर्वत्र चर्चेत असून त्यासंबंधी नवनवीन अपडेट्सही येत असल्याच्या बातम्या आहेत. त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI चा वापर करण्यात येणार असून ही सुविधा आता अमेरिकेतील आयफोन यूजर्सना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अमेरिकेनंतर ही सुविधा भारतातील ग्राहकांसाठीही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आहे.


ओपन एआय ChatGPT भविष्यासाठी चांगला मानला जातो. ज्याचे अनेक फायदे लोकांना होवू शकतात. AI ChatGPT चर्चा देखील सध्या जोरदार सुरू आहे. एकीकडे हे अॅप खूप लोकप्रिय होत आहे तर दुसरीकडे याच्या आयफोन यूजर्सची संख्या जोरदार वाढत आहे. ChatGPT मध्ये असणाऱ्या काही विशिष्ट कारणांमुळे हे लोकांच्या पसंतीस पडत आहे.  MacRumors च्या रिपोर्टनुसार हे अॅप आणखीन आकर्षित होत असून यूजर्सची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र हे ChatGPT आता आयफोन वापरकर्त्यांसाठी प्ले स्टोअरवर लाँच करण्यात आले आहे. ज्याचा फायदा  वापरकर्त्यांना मोठ्या प्रमाणात होवू शकतो. केवळ जे लोक आयफोन वापरतात त्यांनाच या  ChatGPT चा वापर करता येणार आहे.


हे अॅप आयफोन वापरकर्त्यांसाठी विनामूल्य असणार आहे. तुम्हाला हवी असणारी प्रत्येक गोष्ट तुम्ही या अॅपवर सर्च करू शकता आणि त्याचे उत्तर तुम्हाला अगदी काही सेकंदात मिळू शकते. AI ChatGPT मध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व वैशिष्ट्यांचा वापर आयफोन यूजर्स करू शकणार आहेत. सध्या केवळ हे अॅप अमेरिकेमध्ये लाँच होणार असून त्या ठिकाणचे यूजर्स याचा वापर करू शकतात. येत्या काही काळातच   AI ChatGPT भारतात देखील येणार असून भारतातील आयफोन वापरकर्त्यांनासुद्धा याचा वापर लवकरच करता येणार आहे. वापरकर्त्यांनी दिलेल्या प्रतिसादावरून त्यात हवे ते बदल करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 


What Is ChatGPT : काय आहे AI ChatGPT?


हे एक सॉफ्टवेअर आहे, त्याचे पूर्ण नाव (Generative Pretrained Transformer) आहे. तुम्ही याला आधुनिक न्यूरल नेटवर्क आधारित मशिन लर्निंग मॉडेल (Neural network based machine learning model) असेही म्हणू शकता. हे सॉफ्टवेअर तुम्हाला गुगल प्रमाणे रिअल टाईम सर्च तर देतेच शिवाय तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही अगदी स्पष्ट आणि नेमक्या शब्दात देतं. हे अॅप तुम्हाला विचारलेले उत्तर लिहून देते. 


How Chat GPT Works : चॅट जीपीटी कशाप्रकारे काम करतं? 


ओपन एआयने (OpenAI) चॅट जीपीटी (Chat GPT) तयार केला आहे. हे गुगल सर्च इंजिनप्रमाणे काम करते. पण त्याला उत्तर देण्याची पद्धत गुगलपेक्षा खूप वेगळी आहे. गुगल (Google) तुम्हाला कोणत्याही प्रश्नाला उत्तर म्हणून अनेक वेबसाइट्सच्या लिंक देते. पण चॅट जीपीटी (Chat GPT) तुमच्या प्रश्नाचे थेट उत्तर देते. त्यामुळे येत्या काळात चॅट GPT गुगलला चांगली टक्कर देखील देऊ शकते. 


ही बातमी वाचा



 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI