Maharashtra HSC Result 2023: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर (Maharashtra HSC Results 2023 Declared) झाला आहे. मागीलवर्षी राज्याचा निकाल 94.22 टक्के होता. यावेळी तो 91.25 टक्के आहे.  म्हणजे मागीलवर्षी पेक्षा यावर्षीचा निकाल 2.97 टक्क्यांनी कमी  झाला आहे. 

कोरोना प्रादुर्भावाच्या अगोदर निकाल 90.66 टक्के

यंदा बारावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या होत्या.  कोरोना प्रादुर्भावामुळे  परीक्षेत अनेक बदल करण्यात आले होते.   कोरोनामुळे पहिल्या वर्षी परीक्षा ऑनलाईन घेण्यात आल्या होत्या. तर गेल्या वर्षी परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात आल्या होत्या. तसेच परीक्षांसाठी वेळ देखील वाढवून देण्यात आला होता. यंदा मात्र  परीक्षा घेताना कोणतीही सवलत देण्यात आली नव्हती परिणामी याचा परिणाम निकालावर पाहायला मिळत आहे. मात्र कोरोना आधीच्या म्हणजे फेब्रुवारी - मार्चमध्ये लागलेल्या निकालापेक्षा यावेळचा निकाल 0.59 ने अधिक आहे.  कोरोना प्रादुर्भावाच्या अगोदर निकाल 90.66 टक्के लागला होता.

मागील तीन वर्षाचा तुलनात्मक निकाल

शाखा 2020 2021 2022 2023
विज्ञान    96.93 99.45 98.30 96.09
कला 82.63 99.83 90.51 84.05
वाणिज्य 91.27 99.91 91.71 90.42
व्यवसाय अभ्यासक्रम 86.07 98.80 92.40 89.25
एकूण 90.66 99.63 94.22 91.25


मार्च- एप्रिल 2022 चा निकाल 94.22 टक्के होता. फेब्रुवारी-मार्च 2023 चा निकाल 91.25 टक्के होता. त्यामुळे मार्च एप्रिल 2022 च्या तुलनेत या वर्षी निकाल 2.97 टक्के कमी आहे. फेब्रुवारी- मार्च 2020 च्या निकालाची तुलना करता फेब्रुवारी - मार्च 2023 चा निकाल 0.59 वाढला आहे. 154 विषयांपैकी 23 विषयांचा निकाल 100 टक्के लागला असल्याची माहिती मंडळाच्यावतीने देण्यात आली आहे

कुठे पाहता येणार निकाल?

राज्याचा निकाल 91.25 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल हा दुपारी दोन वाजल्यानंतर पाहता येणार आहे. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटसह एबीपी माझाच्या mh12.abpmajha.com वेबसाईटवरही विद्यार्थी हा निकाल पाहू शकतात. बारावीच्या परीक्षेत  154 विषयांचा समावेश होता. त्यापैकी 23 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.

एबीपी माझाच्या वेबसाईटवर बारावीचा निकाल पाहण्यासाठी खालीली स्टेप्स फॉलो करा 

स्टेप 1 : सर्वात आधी एबीपी माझाच्या वेबसाईटवर लॉन ऑन करा.
स्टेप 2 : बारावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करा.
स्टेप 3 : तुमच्यासमोर एक नवं पेज ओपन होईल, तिथे असलेल्या बॉक्समध्ये तुमचा सीट नंबर टाका.
स्टेप 4 : त्याखालच्या बॉक्समध्ये तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा (उदा. आईचं नाव SONALI असेल तर तुम्हाला SON लिहावं लागेल)
स्टेप 5 : एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
स्टेप 6 : निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा.

इतर महत्त्वाच्या बातम्या :

Maharashtra HSC Result 2023: यंदा 23 विषयांचा निकाल 100 टक्के, तर विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI