तुम्ही बघितलं असेल की तुमच्या इंस्टाग्रामवर एक नवीन फिचर्स आलं असेल. त्याचं नाव आहे रिपोस्ट. यामुळे आता तुम्हाला आवडलेल्या कोणतीही सार्वजनिक रील किंवा पोस्ट तुमच्या फॉलोअर्ससोबत पुन्हा शेअर करू करता येईल. जेव्हा तुम्ही पोस्ट पुन्हा Repost करता तेव्हा ती तुमच्या प्रोफाइलमध्ये वेगळ्या "रिपोस्ट" टॅबमध्ये दिसेल आणि तुमच्या फॉलोअर्सच्या फीडमध्ये देखील जाऊ शकते. मेटाने इंस्टाग्रामसाठी काही नवीन फीचर्स लाँच केली. ज्यात रिपोस्ट, लोकेशन शेअरिंग मॅप आणि एक नवीन 'फ्रेंड्स' विभाग समाविष्ट आहे.
Instagram Reposting: मेटाने बुधवारी इंस्टाग्रामसाठी काही नवीन फीचर्स लाँच केली. ज्यात रिपोस्ट, लोकेशन शेअरिंग मॅप आणि एक नवीन 'फ्रेंड्स' विभाग समाविष्ट आहे. या बदलांचा उद्देश यूझर्सना एकमेकांशी अधिक कनेक्ट होण्याची संधी देणे आणि नवीन सामग्री एक्सप्लोर करणे सोपे करणे आहे. तथापि, या बदलांबद्दल सोशल मीडियावर लोकांमध्ये देखील नाराजी आहे. काही लोक त्याला टिकटॉकची कॉपी देखील म्हणत आहेत.
त्याचे फायदे
• तुम्ही तुमच्या आवडत्या गोष्टी तुमच्या मित्रांसोबत सहजपणे शेअर करू शकता.• निर्मात्यांना याचा फायदा देखील होईल कारण त्यांचे रील्स किंवा पोस्ट अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकतात.