X New Features : इलाॅन मस्क यांनी जेव्हापासून X (Twitter) विकत घेतले तेव्हापासून त्यांनी अनेक बदल केले आहेत. नवनवीन अपडेट्स आणले आहेत. आता पुन्हा X (Twitter) यूजर्सकरता त्यांनी आज मोठी घोषणा केली आहे. म्हणजेच आता WhatsApp प्रमाणे X (Twitter) वर देखील व्हिडीओ आणि आॅडिओ काॅल करता येणार आहे. मस्क यांनी आपल्या अधिकृत एक्स हँडलवरून याबाबत पोस्ट केली आहे. 


"एक्सवर आता व्हिडीओ आणि ऑडिओ कॉल्स करता येतील. लवकरच हे फीचर उपलब्ध होणार आहे. आयओएस, अँड्रॉईड, मॅक आणि पीसी या सर्व प्लॅटफॉर्मवर हे फीचर काम करेल." असं मस्क यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. विशेष म्हणजे काॅल करण्याकरता तुम्हाला फोन नंबरची देखील आता गरज नसणार आहे. म्हणजेच यूजर्स आता आपला नंबर शेअर न करताही एखाद्याशी फोनवर बोलू शकणार आहेत.


एक्स ठरणार 'ग्लोबल अ‍ॅड्रेस बुक'


आयफोन, अँड्रॉईड, अ‍ॅपल मॅकबुक आणि विंडोज किंवा अन्य पीसी अशा सर्व डिव्हाईसेसना हे फीचर्स सपोर्ट करणार आहेत. त्यामुळे 'एक्स' हे एक प्रकारे ग्लोबल अ‍ॅड्रेस बुक ठरेल, असं इलॉनने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.






X (Twitter) व्हाट्सअॅपला देणार टक्कर 


X (Twitter) च्या या नवीन फिचरमुळे व्हाट्सअॅप सोबत स्पर्धा होणार आहे. WhatsApp वर नंबर शेअर केल्याशिवाय आपण समोरच्या व्यक्तीला Video किंवा Audio Call करू शकत नव्हतो. पण एक्सवर कॉल करताना याची आवश्यकता नसल्यामुळे लोक याचा अधिक वापर करण्याची शक्यता आहे. X शी स्पर्धा करण्यासाठी झुकेरबर्गने अलीकडेच नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Threads लाँच केले. मात्र, आता X चे हे नवीन फिचर्स सादर केल्यानंतर इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपला मोठा धक्का बसू शकतो.


एलाॅन मस्कने अगदी काही दिवसांपूर्वी पेड यूजर्ससाठी एका नवीन फिचर दिले होते. पेड यूजर्स आता X वर 3 तासांपर्यंतचे मोठे व्हिडीओ अपलोड करू शकतात. यूजर्स 1080p मध्ये 2 तासांपर्यंत आणि 720p मध्ये 3 तासांपर्यंत व्हिडीओ पोस्ट करू शकतात. 


टीव्हीवर लांबलचक व्हिडीओही पाहता येतील


याशिवाय एलॉन मस्क यांनी सशुल्क यूजर्सना एअरप्लेची सुविधा दिली आहे. याअंतर्गत यूजर्स स्मार्ट टीव्हीमध्ये व्हिडीओही प्ले करू शकतात. हे फीचर लांबलचक व्हिडीओ पाहण्यासाठी फायदेशीर आहे. X प्रीमियम यूजर्सना लोकप्रिय व्हिडीओंसाठी पिक्चर-इन-पिक्चर आणि ऑटो कॅप्शनसाठी समर्थन देखील मिळेल. याबरोबरच लाईव्हची व्हिडीओ क्वालिटीही यापूर्वी करण्यात आली आहे. मस्क यांनी अँड्रॉइड आणि आयओएस यूजर्ससाठी इमर्सिव्ह व्हिडीओ प्लेअरचे समर्थन केले आहे.


 


इतर महत्वाच्या बातम्या


Google Software : Google कडून भारतासाठी इंग्रजी आणि हिंदीत AI सर्च टूल सादर; कसे वापराल? वाचा संपूर्ण प्रक्रिया