Instagram Down: गेल्या 24 तासांमध्ये मेटाला दुसरा झटका बसला असून आता व्हॉट्सअॅपनंतर इन्स्टाग्राम डाऊन (Instagram Down) झाल्याची माहिती आहे. मेटाच्या फोटो आणि व्हडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्म असलेल्या इन्स्टाग्रामवर यूजर्सना फोटो आणि व्हिडीओ डाऊनलोड करताना यूजर्सना समस्या येत असल्याच्या तक्रारी आहेत. 


इन्स्टाग्राम डाऊन झाल्यानंतर त्याच्या तक्रारीसाठी यूजर्सनी ट्विटरचे प्लॅटफॉर्म (Twitter) वापरल्याचं दिसून येतंय. ट्विटरवर #InstagramDown हा ट्रेन्ड सुरू आहे. इन्स्टाग्राम डाऊन कशामुळे झालं आहे याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कंपनीच्या वतीनंही त्यावर कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलं नाही. 


डाऊन डिटेक्टरने दिली माहिती 


आउटेज ट्रॅकिंग वेबसाईट डाऊन ट्रॅकिंगने इन्स्टाग्राम डाऊनची माहिती दिली. दुपारी 1.30 च्या सुमारास इन्स्टाग्राम डाऊन झालं आणि त्यानंतर अनेकांनी याबाबतच्या तक्रारी केल्या. पूर्ण देशभरातील यूजर्सनी इन्स्टाग्राम डाऊन असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. काही जणांनी मात्र इन्स्टाग्राम सेवा सुरळीत असल्याचं सांगितलं आहे. 


इन्स्टाग्राम डाऊन व्हायच्या काही तास आधी मेटाचे मेसेंजिग अॅप व्हॉट्सअॅप सेवादेखील डाऊन झाल्याच्या तक्रारी होत्या. यावर मेसेज पाठवणे किंवा मेसेज येण्यामध्ये अडचणी येत होत्या. त्यानंतर काही वेळाने ही सेवा पूर्ववत झाली. 


काही यूजर्सनी सांगितलं की त्यांचं इन्स्टाग्राम अॅप डाऊन झाल्यानंतर त्यांनी ते अनइन्स्टॉल केलं आणि नंतर पुन्हा रिइन्स्टॉल केलं. त्यानंतर त्यांचं इन्स्टाग्राम अकाउंट व्यवस्थित सुरू झालं.






गेल्या आठवड्यातही Instagram सह Meta च्या मालकीचे सर्व प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्म काही तासांसाठी बंद होते. इंस्टाग्राम डाऊन होण्याची ही या वर्षातील तिसरी वेळ आहे. मे महिन्यात यूएस मधील अनेक वापरकर्त्यांनी त्यांना इन्स्टाग्राम वापरताना अडचणी येत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या.  मार्चमध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी जवळपास 27,000 यूजर्स इन्स्टाग्राम वापरू शकले नव्हते.