Netflix Expands Password Sharing Crackdown : नेटफ्लिक्स (Netflix) हे मनोरंजनाचं उत्तम व्यासपीठ आहे. नेटफ्लिक्सवर बघत तुम्ही तासनतास बसून तुमचा वेळ घालवून तुमचं मनोरंजन करु शकता. पण आता नेटफ्लिक्स युजर्ससाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेली नेटफ्लिक्स पासवर्ड शेअरिंग (Netflix Password Sharing Stopped) आता थांबण्यात आलं आहे. तुम्ही आता नेटफ्लिक्सचा पासवर्ड मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करू शकणार नाहीत. नेटफ्लिक्सने पासवर्ड शेअरिंग बंद केलं आहे.


नेटफ्लिक्सचा मोठी निर्णय


नेटफ्लिक्सने आजपासून भारतात पासवर्ड शेअरिंग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा मोठा निर्णय घेत कंपनीनं सांगितलं आहे की, त्यांनी भारतात पासवर्ड शेअरिंग बंद केलं आहे. तसेच घराबाहेर नेटफ्लिक्स शेअर करणाऱ्या युजर्संना ईमेल पाठवण्यास सुरुवात केली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला नेटफ्लिक्सने युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंगडम, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रिया, सिंगापूर, मेक्सिको, ब्राझील यासारख्या 100 देशांमध्ये पासवर्ड शेअरिंग पर्याय बंद केला होता.


आजपासून नेटफ्लिक्स पासवर्ड शेअरिंग बंद


नेटफ्लिक्सने भारत, इंडोनेशिया, क्रोएशिया आणि केनियामध्ये 20 जुलैपासून पासवर्ड शेअरिंगवर बंदी घातली आहे. येत्या सहामाहीत आपला महसूल वाढवण्यासाठी नेटफ्लिक्सने पासवर्ड शेअरिंगवर बंदी घातली आहे. नेटफ्लिक्सच्या शेअरिंग धोरणांमध्ये बदल झाल्यानंतर त्याचा खूप फायदा झाला आहे. नवीन महसुलाचे आकडे पाहता प्लॅटफॉर्मने हा निर्णय घेतला आहे.


एकाच घरातील लोकांना नेटफ्लिक्स पाहता येणार


नेटफ्लिक्सने एका निवेदनात म्हटलं आहे की, जे लोक एकाच घरात राहतात ते एकाच अकाऊंटवर नेटफ्लिक्स वापरू शकतात, मग ते घरी असो किंवा सुट्टीवर असो. हे युजर्स ट्रान्सफर प्रोफाइल, मॅनेज ऍक्सेस आणि डिव्हाइसेस या नवीन फीचर्सचा लाभ घेऊ शकतात. जे त्यांच्या ग्राहक त्यांच्या कुटुंबाबाहेर पासवर्ड शेअर करत आहेत, त्या ग्राहकांना कंपनीने मेल केले आहेत.


काय म्हणाली कंपनी?


कंपनीनं सांगितलं की, आमच्या युजर्सकडे मनोरंजनाचे अनेक पर्याय आहेत, म्हणूनच आम्ही अधिकाधिक नवीन चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये गुंतवणूक करत आहोत. अशा परिस्थितीत, तुमच्या इच्छेनुसार, मनानुसार, मनःस्थितीनुसार आणि भाषेनुसार, जे नेटफ्लिक्स पाहत आहेत, त्यांना अनेक मनोरंजक गोष्टी पाहता येतील.


100 पेक्षा जास्त देशांमध्ये नेटफ्लिक्स पासवर्ड शेअरिंग बंद


नेटफ्लिक्सने भारतासह 100 हून जास्त देशांमध्ये पासवर्ड शेअरिंग सुविधा बंद केली आहे. यामध्ये अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, मेक्सिको आणि ब्राझील या देशांचा समावेश आहे. 


पासवर्ड शेअरिंग बंद केल्यामुळे कंपनीचा मोठा फायदा


पासवर्ड शेअरिंग बंद केल्यामुळे नेटफ्लिक्सचे जगभरात 60 लाख सबस्क्रायबर्स वाढले आहेत. नेटफ्लिक्सने पासवर्ड शेअरिंग बंद केल्यामुळे कंपनीला मोठा फायदा झाला आहे. यातून कंपनीने गेल्या सहामाहीत 150 कोटींची कमाई केली आहे.