Infinix Zero 30 5G launched : जर तुम्हीसुद्धा बजेट फ्रेंडली स्मार्टफोनच्या शोधात आहात तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण नुकताच भारतात 20 ते 22,000 हजारांच्या किंमतीत एक स्मार्टफोन लॉन्च झाला आहे. Infinix Zero 30 5G असं या स्मार्टफोनचं नाव असून हा एक मध्यम श्रेणीचा स्मार्टफोन आहे. कंपनीने मोबाईल फोन 2 स्टोरेज पर्यायांमध्ये लॉन्च केला आहे. एक 8/256GB आणि दुसरा 12/256GB आहे. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 108MP प्रायमरी कॅमेरा, 5000 mAh बॅटरी आणि Dimensity 8020 प्रोसेसर मिळत आहे. या स्मार्टफोनमध्ये आणखी कोणती वैशिष्ट्ये आहेत ते जाणून घेऊयात.
स्मार्टफोनचं वैशिष्ट्य काय?
Infinix Zero 30 5G या स्मार्टफोनच्या डिस्प्लेच्या आसपास स्लिम आणि एकसमान बेझल आढळतात. फ्रेमच्या तळाशी स्पीकर ग्रिल, टाईप-सी पोर्ट आणि मायक्रोफोन आहे. स्टिरिओ आवाजासाठी दुय्यम स्पीकर ग्रिल आणि आवाज रद्द करण्यासाठी दुय्यम मायक्रोफोन देण्यात आला आहे. सेल्फी कॅमेरा डिस्प्लेच्या वरच्या मध्यभागी होल-पंच कटआउटमध्ये ठेवला आहे. फिंगरप्रिंट सेन्सर डिस्प्लेच्या आत आहे. Infinix Zero 30 5G ची रचना खूपच आकर्षक आहे.
किंमत किती आहे?
Infinix Zero 30 5G च्या 8/256GB व्हेरिएंटची किंमत 23,999 रुपये आहे तर 12/256GB व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये आहे. तुम्ही हा स्मार्टफोन ग्रीन आणि गोल्डन कलरमध्ये खरेदी करू शकता. सध्या Infinix Zero 30 5G साठी प्री-ऑर्डर सुरू आहे. अॅक्सिस बँकेचे कार्ड वापरून तुम्ही 2,000 रुपयांची बचत करू शकता. या स्मार्टफोनची पहिली विक्री 8 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
कॅमेरा कसा आहे?
या स्मार्टफोनमध्ये 144hz रिफ्रेश रेटसह 6.78-इंच फुल एचडी + AMOLED डिस्प्ले, 68W फास्ट चार्जिंगसह 5000 mAh बॅटरी आणि ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 8020 प्रोसेसरसाठी सपोर्ट आहे. फोटोग्राफीसाठी, स्मार्टफोनमध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सपोर्टसह 108MP प्रायमरी कॅमेरा, 13MP अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 2MP कॅमेरासह ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. फ्रंट 50MP कॅमेरा उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये कर्ल डिस्प्ले आणि लेदर फिनिश बॅक पॅनल आहे जो स्मार्टफोनला प्रीमियम लूक देतो.
लवकरच 'हा' स्मार्टफोन होणार लॉन्च
उद्या Realme एक बजेट फ्रेंडली स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. कंपनीने हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर लिस्ट केला आहे. दृष्यदृष्ट्या, हा स्मार्टफोन मागील बाजूने आयफोनसारखा दिसतो. यामध्ये तुम्हाला ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि 5000 mAh बॅटरी मिळेल. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा उपलब्ध असेल.
महत्त्वाच्या बातम्या :
Upcoming Phones : 'हे' स्मार्टफोन्स सप्टेंबर महिन्यात दमदार फिचर्ससह होणार लाँच , पाहा संपूर्ण यादी