Infinix InBook Y1 Plus : Infinix चा नवा लॅपटॉप लवकरच भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहे. याची लॉन्चिंग डेट निश्चित झाली आहे. हा लॅपटॉप अशा लोकांसाठी खास असेल, जे बजेटमध्ये चांगला लॅपटॉप शोधत आहेत. हा कंपनीचा नवीन बजेट लॅपटॉप आहे. कंपनीच्या या लॅपटॉपची विक्री फ्लिपकार्टद्वारे केली जाईल. लॉन्च होण्यापूर्वी हा लॅपटॉप फ्लिपकार्टवर लिस्ट करण्यात आला आहे. लिस्टिंगमधून लॅपटॉपचे काही खास फीचर्सही समोर आले आहेत. कोणते आहेत हे खास फीचर्स याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...


Infinix Inbook Y1 Plus लॉन्चिंग डेट 


Infinix आपला नवीनलॅपटॉप Infinix InBook Y1 Plus भारतीय बाजारपेठेत उद्या म्हणजेच 20 फेब्रुवारी 2023 रोजी लॉन्च करणार आहे. लॉन्चिंगची वेळ दुपारी 12 वाजता असेल. लॅपटॉप ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर लॉन्च तारखेसह सूचीबद्ध आहे. लॅपटॉपच्या कलर ऑप्शनबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला यात ग्रे, ब्लू आणि सिल्व्हर कलर पर्याय मिळू शकतात. मात्र लॅपटॉपची किंमत आणि विक्रीची तारीख अद्याप समोर आलेली नाही.


Infinix Inbook Y1 Plus चे फीचर्स 



  • डिस्प्ले: 15.6 इंच फुल एचडी डिस्प्ले

  • कमाल ब्राइटनेस: 250 निट्स

  • प्रोसेसर: इंटेल कोअर i3 10व्या जनरल प्रोसेसर

  • रॅम आणि स्टोरेज: 8GB रॅम आणि 256GB आणि 512GB स्टोरेज

  • बॅटरी: 50Whr

  • चार्जिंग: 45W टाइप-सी चार्जिंग पोर्ट

  • कनेक्टिव्हिटी: USB 3.0 आणि HDMI पोर्ट

  • ऑपरेटिंग सिस्टम: विंडोज 11

  • वेबकॅम: 2MP वेबकॅम




Infinix Inbook Y1 Plus लॅपटॉपच्या साईडला पातळ बेझल्स मिळतील. जर तुम्हाला स्टोरेज वाढवायचे असेल तर यात 2TB पर्यंत स्टोरेज वाढवण्याची सुविधा आहे. लॅपटॉपमध्ये 50Whr बॅटरी दिली जाऊ शकते, जी एका चार्जवर 10 तास चालेल. लॅपटॉप 1 तासाच्या आत 75 टक्के चार्ज होऊ शकतो, हे लिस्टिंगवरून समोर आले आहे. वेबकॅमसह लॅपटॉपमध्ये एलईडी फ्लॅशलाइट, ड्युअल माइक आणि एआय नॉइज रिडक्शन फीचर उपलब्ध असेल.


Realme Book (Slim)


जर तुम्ही लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमची प्राथमिकता चांगला डिस्प्ले आणि बॅटरी लाइफ असेल, तर तुमच्यासाठी Realme Book (Slim) हा एक चांगला लॅपटॉप पर्याय आहे. हा लॅपटॉप 11व्या जनरेशन इंटेल कोर I3 प्रोसेसरसह येतो. ज्यामध्ये 2K QHD रिझोल्यूशनचा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. लॅपटॉपमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर, 256GB SSD आणि हरमन स्पीकर उपलब्ध आहेत.