Twitter Removing Basic Safety Feature : जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक आणि ट्विटरचे (Twitter) मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर कंपनी खरेदी केल्यापासून ट्विटर आणि एलॉन मस्क दोघंही प्रचंड चर्चेत आहेत. मस्क यांनी अनेक मोठे निर्णय आणि बदल करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आता पुन्हा एकदा एलॉन मस्क ट्विटर युजर्संना मोठा झटका देण्याच्या तयारीत आहेत. मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर आता अकाऊंट सेफ्टीसाठीही आकारणार आहे. ट्विटरवरील तुमचं अकाऊंट सुरक्षित ठेवण्यासाठीही आता तुम्हाला खिसा खाली करावा लागणार आहे. 


अकाऊंट सेफ्टीसाठीही ट्विटर आकारणार शुल्क


ट्विटर युजर्संना आता त्यांचे खातं (Account) सुरक्षित ठेवण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. 20 मार्चपासून ट्विटरकडून नवे नियम लागू करण्यात येणार आहेत. फक्त ब्लू टिक युजर्सना मेसेजद्वारे टू फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) वापरण्याची मुभा मिळेल. इतर वापरकर्त्यांना त्यासाठी शुल्क द्यावं लागेल. कंपनीने ट्विट करून ही माहिती दिली आहे.




टू फॅक्टर ऑथेंटिकेशनसाठी मोजावे लागणार पैसे


टू फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) हे अकाऊंट सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. यामुळे तुमच्या अकाऊंटला पासवर्ड व्यतिरिक्त आणखी एक सुरक्षा मिळते. यामुळे युजरशिवाय इतर कोणीही ट्विटर अकाऊंट वापरण्याचा किंवा अॅक्सेस करू शकत नाही. यामध्ये ट्विटर लॉगिन मेल किंवा मोबाईलवर मेसेज येतो. ज्यांच्याकडे ट्विटर ब्लू टिक अकाऊंट नाही त्यांच्यासाठी, त्यांचे खाते सुरक्षित करण्यासाठी 2FA हा एक मार्ग आहे. मात्र, त्यासाठीही आता पैसे मोजावे लागणार आहेत.


ट्विटरने टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) फिचरबाबत आता ट्विटरने एक नवीन घोषणा केली आहे. ट्विटरने शुक्रवारी सांगितलं की, टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) फिचर आता फक्त पेड युजर्स म्हणजे ब्लू टिक सबस्क्रिप्शन असलेल्या युजर्संनाच त्यांचं अकाऊंट सुरक्षित करण्यासाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन फिचर वापरण्याची परवागनी असेल. 


20 मार्चपासून, फक्त ब्लू सबस्क्रिप्शन युजर्संना 2FA फिचर वापरता येईल. इतर अकाऊंटवरून हे फिचर हटवण्यात येईल. त्यानंतर ज्या युजर्सना हे फिचर हवे असेल त्यांना शुल्क भरावे लागेल, त्यानंतरच त्यांना हे सेफ्टी फिचर वापरता येईल. ट्विटर कंपनीने ट्विट करत सांगितलं आहे की, "20 मार्चपासून फक्त ट्विटर ब्लू टिक सबस्क्रिप्शन असणारे सदस्य त्यांच्या टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) फिचर वापरता येईल."


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Twitter : भारतातील ट्विटर ऑफिसला टाळं, एलॉन मस्क यांचा मोठा निर्णय; कर्मचाऱ्यांना दिला 'हा' आदेश