IPL 2024 : सर्व क्रिकेटप्रेमींनी ज्या मॅचची उत्सुकता असते असा आयपीएलचा (IPL 2024) सामना कालपासून (22 मार्चपासून) सुरु झाला आहे. आयपीएलचा हा 17वा सीझन असून त्याची सुरुवात चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमपासून सुरु झाली. यावेळी आयपीएलचा पहिला सामना मागच्या वर्षीचा आणि महेंद्रसिंग धोनीचा संघ चेन्नई सुपर किंग्ज आणि विराट कोहलीचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झाला. या आयपीएल सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग तर तुम्ही पाहिलं असेलच. पण, जर तुम्हाला संपूर्ण आयपीएल सीझन ऑनलाईन पाहायचा असेल तर तो कुठे आणि कसा पाहणार याविषयीच आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.
आयपीएलचा सामना मोफत कसा पाहावा?
आयपीएलचा सामना कालपासूनच सुरु झाला आहे. याचं लाईव्ह स्ट्रीमिंग सगळ्यांनीच आपल्या मोबाईलवर पाहिलं असेल. पण, जर तुम्हाला संपूर्ण मॅचच्या संबंधित माहिती आणि मॅच ऑनलाईन पाहायची असेल तर त्यासाठी Jio ने आपल्या यूजर्ससाठी तसेच प्रत्येक टेलिकॉम नेटवर्कच्या यूजर्सना IPL पाहण्याची मोफत सुविधा उपलब्ध करून दिली आहे. Jio बरोबरच, Airtel, Vodafone, Idea, BSNL आणि इतर अनेक नेटवर्कचे सिम वापरणारे लोक देखील IPL मोफत पाहू शकतात. यासाठी यूजर्सना आपल्या स्मार्टफोनवर फक्त Jio Cinema हे ॲप डाऊनलोड करावं लागेल. त्यनंतर तुम्ही संपूर्ण मॅचचा सीझन घरबसल्या ऑनलाईन पाहून सामन्याची मजा घेऊ शकता.
अगदी मोफत पाहा आयपीएलचा सामना
काही वर्षांपूर्वीपर्यंत, आयपीएलचे सामने पाहण्यासाठी, यूजर्सना आपल्या मोबाईलमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर म्हणजेच डिस्ने प्लस हॉटस्टार (Hotstar) ॲप इन्स्टॉल करावं लागत होतं. तसेच, पैसे खर्च करून त्याचे सबस्क्रिप्शनही विकत घ्यावं लागत होतं. त्यानंतरच यूजर्स आपल्या मोबाईलमध्ये आयपीएलचे सामने पाहू शकत होते. पण, आता तुम्हाला एक रूपयाही खर्च करण्याची गरज नाही. तसेच, कोणत्याही OTT ॲपचे सबस्क्रिप्शन घेण्याची गरज नाही.
या ठिकाणी तुमच्या मोबाईलवर Jio Cinema ॲप डाऊनलोड केल्यानंतर स्पोर्ट्स विभागात जावं लागेल. या ठिकाणी तुम्हाला आयपीएल सामन्याची जाहिरात दिसेल, त्यावर क्लिक करून तुम्ही आयपीएल सामना विनामूल्य पाहू शकतात. स्पोर्ट्स कॅटेगरीमध्ये गेल्यानंतर जर तुम्हाला मॅचचा ऑप्शन दिसत नसेल, तर क्रिकेट कॅटेगरीमध्ये जावं लागेल.
14 भाषांमध्ये घ्या आयपीएल सामन्यांचा आनंद
Jio Cinema ने IPL सामन्यांसाठी आपल्या ॲपमध्ये अनेक खास फीचर्सचा समावेश केला आहे. जसे की, तुम्ही हे सामने हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त, 14 भाषांमध्ये आयपीएल सामन्यांचा आनंद घेता येणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना आपल्या आवडत्या भाषेत सामने पाहता येतील.
आज 'या' टीम खेळतील आमने-सामने
आज पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये (Delhi Captials) आयपीएलचा सामना रंगणार आहे. हा सामना महाराजा यदाविंद्र सिंह स्टेडियमवर होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :