Pvc Aadhaar Card : पूर्वी आधार कार्ड कागदाचे बनवले ( Pvc Aadhaar Card ) जायचे, त्यावर प्लॅस्टिकचे लॅमिनेशन असायचे. काही काळानंतर लॅमिनेशन खराब होते. यानंतर ते पुन्हा लॅमिनेट करावं लागलं, पण आधार कार्ड पुन्हा पुन्हा लॅमिनेट करणं टाळायचं असेल तर पीव्हीसी आधार कार्ड घ्यावं. त्याची किंमत फक्त 50 रुपये आहे. यासाठी तुम्ही काही खास स्टेप्स फॉलो केल्या पाहिजेत.


पीव्हीसी आधार कार्डसाठी अर्ज कसा करावा


-सर्वप्रथम तुम्हाला https://residentpvc.uidai.gov.in/order-pvcreprint वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
-यानंतर तुम्हाला 12 अंकी आधार कार्ड टाकावे लागेल.
-त्यानंतर तुम्हाला सिक्युरिटी कोड टाकावा लागेल, जो तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
-My Mobile number is not registered  नाही असे दिसले तर तो सिलेक्ट करावा लागेल. जेव्हा तुमचा मोबाईल  नंबर   आधारशी लिंक नसेल तेव्हा असे होईल.
-मोबाइल आधारशी लिंक करण्यासाठी मोबाइल नंबर टाकावा लागतो.
-मोबाइल नंबर लिंक केल्यास तुम्हाला हा पर्याय दिसणार नाही.
-त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. त्यानंतर त्याची व्हेरिफाय करावं लागते.
-यानंतर तुम्हाला पेमेंट करावं लागेल.
-त्यानंतर 28 अंकी सर्व्हिस रिक्वेस्ट येईल.
-या 28 अंकाच्या मदतीने तुम्ही पीव्हीसी आधार कार्ड ट्रॅक करू शकता.


आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत वाढली


 आधार कार्ड हे अतिशय महत्त्वाचं कागदपत्र असून ते अपडेट असणं आवश्यक आहे. आधार कार्ड (ADHAR Card) मोफत अपडेट करण्यासाठी सरकारने 14 डिसेंबर ही मुदत दिली होती. मात्र आता मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत सरकारने तीन महिन्यांनी वाढवली आहे. आता 14 मार्च 2024 पर्यंत आधार कार्ड मोफत अपडेट करता येणार आहे.  आधार केंद्रावरील लांब रांगेपासून वाचण्यासाठी तुम्ही UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट बुक करू शकता, ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने तुम्हाला आधार अपडेट करता येणार आहे शिवाय आधार केंद्र किंवा CSC केंद्रावर जाऊनही तुम्ही माहिती अपडेट करु शकता. 


महत्वाचं म्हणजे आधार कार्ड मोफत अपडेटची सुविधा फक्त ऑनलाइनसाठी उपलब्ध आहे. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाइटवरून तुम्ही ही माहिती अपडेट करू शकता. सततच्या अपडेटमुळे आधार हा विश्वासार्ह स्त्रोत बनतो. यामुळे तुम्हाला खूप मदत ही होते. त्यामुळेच ते वेळोवेळी अपडेट करणं तितकंच महत्वाचं आहे फ्री अपडेटची तारीखही 14 मार्च पर्यंत वाढवल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे.


इतर महत्वाची बातमी-


Apple Gadgets : Apple Device वर भन्नाट ख्रिसमस ऑफर्स; स्वस्तात मिळतोय Apple MacBook Air, MacBook Pro, iphone 15!